ऑटो पर्यावरण राष्ट्रीय व्यापार

Ola भारतात लाँच करणार Ola Electric Scooters

कॅब सेवा पुरवणारी कंपनी ओला (Ola) भारतात लवकरच Ola Electric Scooters लाँच करण्याच्या तयारीत आहे.

कॅब सेवा पुरवणारी कंपनी ओला (Ola) भारतात लवकरच Ola Electric Scooters लाँच करण्याच्या तयारीत आहे. याशिवाय कंपनी भारतात मॅन्यूफॅक्चरिंग हब बनवण्यासाठीही प्रयत्नशील आहे.

काही दिवसांपूर्वीच ओलाने भारतात लवकरच Ola Electric Scooters लाँच करणार असल्याची घोषणा केली होती. पुढील वर्षी जानेवारीमध्ये ओला भारतात पहिली Ola Electric Scooters लाँच करण्याची शक्यता आहे. इलेक्ट्रिक स्कूटरसाठी ओलाने नेदरलँड्सची कंपनी Etergo BV चे अधिग्रहण केले असून ही कंपनी ओला इलेक्ट्रिक स्कूटर बनवण्यासाठी मदत करणार आहे.

कमी किंमतीत शानदार मायलेज

कमी किंमतीत जास्त मायलेज देणाऱ्या स्कूटर बनवण्यावर ओलाचा भर असणार आहे. त्यात Etergo BV ने एकदा चार्ज केल्यानंतर २४० किलोमीटरपर्यंतचं अतंर कापू शकणारी स्कूटर बनवली आहे. त्यामुळे भारतातही कमी किंमतीत शानदार मायलेज देणारी स्कूटर लाँच करण्याचा ओलाचा प्रयत्न असणार आहे. भारतात सध्या २० मिलियन म्हणजेच २ कोटी स्कूटर आहे. इलेक्ट्रिक स्कूटरला भविष्यातील गाडी मानलं जात आहे. भारतात पहिली स्कूटर लाँच केल्यानंतर एका वर्षात १० लाख इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री करण्याचे कंपनीने लक्ष्य ठेवले आहे.

भारतात मॅन्यूफॅक्चरिंग हब :-

सध्या Etergo BV च्या प्रकल्पातच ओला इलेक्ट्रिक स्कूटरचं प्रोडक्शन घेतलं जाईल. पण, कमी खर्च लागावा यासाठी पूर्णपणे भारतातच इलेक्ट्रिक स्कूटर बनवण्यावर ओलाचा भर असणार आहे. यासाठी ओला भारतातच मॅन्यूफॅक्चरिंग हब बनवण्यासाठी अनेक राज्य सरकारशी चर्चा करीत आहे.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

IPL 14 साठी १८ किंवा १९ फेब्रुवारीला लिलाव

Web News Wala

बुलेटला टक्कर देण्यासाठी बजाज Neuron ने कसली कंबर

Team webnewswala

पर्यावरण पुरक गणेशोत्सव साठी Roatary Club Of Dombivali Midtown सज्ज

Team webnewswala

Leave a Reply