Team WebNewsWala
तंत्रज्ञान

आता WhatsApp वरुन देखील पैसे पाठवता येणार

WhatsApp वरुन पैसे देखील ट्रान्सफर करू शकतात. व्हॉट्सअ‍ॅपला नुकतीच पेमेंट सेवेमध्ये प्रवेश करण्याची संधी मिळाली.

मुंबई : WhatsApp सतत आपल्या यूजर्संना नवीन फीचर्स देत आहे. आता यूजर्स त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅपवरुन पैसे देखील ट्रान्सफर करू शकतात. व्हॉट्सअ‍ॅपला नुकतीच पेमेंट सेवेमध्ये प्रवेश करण्याची संधी मिळाली. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) फेसबुकच्या मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपला आपल्या २० दशलक्ष ग्राहकांना ही पेमेंट सर्व्हिस देण्यास सांगितले आहे. नंतर, हळूहळू सर्व यूजर्ससाठी ही सेवा उपलब्ध होईल. आता आपण या सेवेद्वारे कोठेही पैसे पाठवू शकता. जाणून घ्या ही सेवा आपण कशी सुरु करु शकता.

व्हॉट्सअ‍ॅपवरचे व्यवहार फक्त भारतीय बँक खात्यांशी जोडल्या गेलेल्या भारतीय क्रमांकासाठीच

व्हॉट्सअ‍ॅपद्वारे पेमेंट करण्यापूर्वी आपल्याकडे बँक खाते आणि फोन नंबर असणे आवश्यक आहे. पेमेंट देण्यासाठी आपल्याला एक यूपीआय पासकोड देखील सेट करणे आवश्यक आहे. आपल्याकडे आधीपासून यूपीआय अ‍ॅपसह एक यूपीआय पासकोड असल्यास आपण तो कोड देखील वापरू शकता. हे लक्षात घ्या की व्हॉट्सअ‍ॅपवरचे व्यवहार फक्त भारतीय बँक खात्यांशी जोडल्या गेलेल्या भारतीय क्रमांकासाठीच करता येतात. ज्यांच्याकडे आंतरराष्ट्रीय क्रमांक आहेत ते व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट करू शकत नाहीत.

अशा प्रकारे आपण व्हॉट्सअ‍ॅपवरून पैसे ट्रान्सफर करू शकता

WhatsApp वरुन पैसे देखील ट्रान्सफर करू शकतात. व्हॉट्सअ‍ॅपला नुकतीच पेमेंट सेवेमध्ये प्रवेश करण्याची संधी मिळाली.

आपल्याकडे व्हॉट्सअ‍ॅप असल्यास प्रथम गूगल प्ले स्टोअर किंवा अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरवर जाऊन अपडेट करा.
मग व्हॉट्स अ‍ॅप सेटिंग्जवर जा.

व्हॉट्सअ‍ॅपवर खाली स्क्रोल करा, त्यानंतर पेमेंट पर्यायावर क्लिक करा. मग आपल्याला स्क्रीनवर बँकांची यादी मिळेल.

बँकेचे नाव निवडा.
बँकेशी संबंधित आपला मोबाइल नंबर व्हेरिफाय करा.
एसएमएसद्वारे व्हेरिफाय पर्यायावर जा.

तुमचा व्हॉट्सअ‍ॅप नंबर आणि बँक खाते समान असले पाहिजे.
त्यानंतर अ‍ॅपमध्ये आपल्या बँक खात्याचा तपशील जोडला जाईल.
बँक खात्याचा तपशील जोडल्यानंतर आपण पैसे पाठवू आणि प्राप्त करू शकता.
आपण ज्याला पैसे पाठवू इच्छित आहात त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅप नंबरवरील पेमेंट पर्यायावर जा.
ज्या खात्यात पैसे हस्तांतरित करू इच्छित आहात ते बँक खाते निवडा.
आपण पाठवू इच्छित असलेली रक्कम प्रविष्ट करा आणि व्यवहार पूर्ण करण्यासाठी यूपीआय पिन प्रविष्ट करा.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा फोन Jio Phone 5

Team webnewswala

चक्क आयफोनवर संपूर्ण ‘पिच्चर’ चे चित्रीकरण

Web News Wala

उमंग अ‍ॅप मध्ये पेंशन योजना कामगार मंत्रालयाची नवीन सुविधा

Team webnewswala

Leave a Reply