Team WebNewsWala
आंतरराष्ट्रीय व्यापार

बिग बास्केट खरेदी करत टाटा देणार रिलायन्स ला टक्कर

टाटा डिजिटलनं बिग बास्केट कंपनी खरेदी केली आहे. त्यामुळे आता रिलायन्स रिटेल, ऍमेझॉन आणि फ्लिपकार्ट यांच्यासारख्या कंपन्यांना थेट टक्कर देईल..

बिग बास्केट खरेदी करत टाटा देणार रिलायन्स ला टक्कर

Webnewswala Online Team – टाटा समूहानं आता डिजिटल व्यवसायावर लक्ष केंद्रीत केलं आहे. कोरोना संकट येण्याआधी ऑनलाईन ग्रॉसरी शॉपिंगचं प्रमाण वाढलं होतं. कोरोना काळात तर ग्रॉसरी शॉपिंगला आणखी अच्छे दिन आले. त्यामुळेच या क्षेत्रात वेगानं विस्तार करण्यासाठी टाटा डिजिटलनं बिग बास्केट कंपनी खरेदी केली आहे. त्यामुळे आता टाटा बिग बास्केटच्या माध्यमातून रिलायन्स रिटेल, ऍमेझॉन आणि फ्लिपकार्ट यांच्यासारख्या बड्या कंपन्यांना थेट टक्कर देईल..

बिग बास्केटची स्थापना २०११ मध्ये करण्यात आली होती. सध्या देशभरातील महत्त्वाच्या २५ शहरांमध्ये त्याचा कारभार चालतो.

बिग बास्केट ला खरेदी करत टाटांची रिटेल क्षेत्रात उडी

टाटा डिजिटलनं बिग बास्केट कंपनी ताब्यात घेतली आहे. मात्र यासाठी कंपनीनं किती पैसे मोजले याची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. टाटा समूहानं बिग बास्केटमध्ये ६४ टक्के हिस्सा विकत घेतला आहे. बिग बास्केटच्या संचालकीय बोर्डानं याच आठवड्यात याबद्दलच्या कराराला मंजुरी दिल्याचं वृत्त इकॉनॉमिक टाईम्सनं दिलं आहे. टाटा डिजिटलनं बिग बास्केट या बंगळुरूस्थित स्टार्ट अपमध्ये २० कोटींची प्राथमिक गुंतवणूक केली आहे.

बिग बास्केटमध्ये याआधी चीनच्या अलिबाबा समूह आणि एक्टिस एलएलपीचा मोठा हिस्सा होता. मात्र आता ते यातून बाहेर पडले आहेत. भारतीय प्रतिस्पर्धा आयोगानं (सीसीआय) गेल्याच महिन्यात या कराराला मंजुरी दिली. बिगबास्केट आणि ऑनलाईन फार्मसी 1mg नंतर आता टाटा समूहाची नजर फिटनेस स्टार्टअप क्युरफिटवर आहे. रिटेल क्षेत्रात रिलायन्स उद्योग आणि ऍमेझॉनला टक्कर देण्यासाठी याला महत्त्व आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार टाटा समूहाची क्युरफिटचे संस्थापक मुकेश यांच्याशी बातचीत सुरू आहे. त्यांना टाटा डिजिटलच्या व्यवसायात मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते. बन्सल ऑनलाईन फॅशन रिटेलर मिंत्राचे सहसंस्थापकदेखील आहेत. ते गेल्या ५ वर्षांपासून क्युरफिटची धुरा सांभाळत आहेत.

एक सुपर अ‍ॅप सुरू करण्याची योजना

दरम्यान, टाटा समूहाने आधीच एक सुपर अ‍ॅप सुरू करण्याची योजना जाहीर केली आहे, ज्यामध्ये क्विम (फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म), टाटा सीलिक (लाइफस्टाइल ऑनलाइन शॉपिंग साइट) आणि क्रोमा (इलेक्ट्रॉनिक )चा समावेश आहे. सुपर अ‍ॅप २०२२ या आर्थिक वर्षात टाटा डिजिटलद्वारे लाँच केले जाणार आहे. बिग बास्केटची स्थापना २०११ मध्ये करण्यात आली होती. सध्या देशभरातील महत्त्वाच्या २५ शहरांमध्ये त्याचा कारभार चालतो.

Web Title – बिग बास्केट खरेदी करत आता टाटा देणार रिलायन्स ला टक्कर ( Now Tata will give a blow to Reliance )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

 

Related posts

HIV Positive महिलेच्या शरीरात 216 दिवस कोरोना विषाणू

Web News Wala

मॉरिशस तेल गळती जपानी जहाजाचे झाले दोन तुकडे

Team webnewswala

Google, Amazon ला 16 कोटी डॉलर्सचा दंड

Team webnewswala

Leave a Reply