Team WebNewsWala
अर्थकारण थोडक्यात राष्ट्रीय व्यापार

आता Paytm वरून पेमेंट करणं महागणार

कंपनीने नियमांमध्ये काही बदल केले आहेत. त्यानंतर आता युजर्ससाठी Paytm वरून पेमेंट करणं महागणार
कंपनीने नियमांमध्ये काही बदल केले आहेत. त्यानंतर आता युजर्ससाठी Paytm वरून पेमेंट करणं महागणार

ग्रॉसरी स्टोर्समधून सामान भरण्यासाठी, पाणी-लाईट बिल भरण्यासाठी, गॅस सिलेंडर बुक करण्यासाठी, मोबाईल-डिटीएच रिचार्ज, ऑनलाईन ऑर्डर अशा अनेक गोष्टींसाठी पेटीएम वॉलेटचा (Paytm Wallet) वापर अनेक जण करतात. पण आता युजर्ससाठी Paytm महाग होणार आहे.

आतापर्यंत क्रेडिट कार्डमधून पेटीएम वॉलेटमध्ये मनी लोड केल्यानंतर कोणताही चार्ज द्यावा लागत नव्हता. पण आता कंपनीने नियमांमध्ये काही बदल केले आहेत.

द्यावा लागणार टक्के अतिरिक्त चार्ज 

paytmbank.com/ratesCharges वर देण्यात आलेल्या माहितीनुसार, 15 ऑक्टोबर 2020 पासून एखाद्या युजरने पेटीएम वॉलेटमध्ये क्रेडिट कार्डमधून मनी ऍड केल्यास, त्याला 2 टक्के अतिरिक्त चार्ज द्यावा लागणार आहे. या 2 टक्के चार्जमध्ये जीएसचीचा समावेश असणार आहे. उदा. जर तुम्ही क्रेडिट कार्डने पेटीएम वॉलेटमध्ये 100 रुपये टाकले, तर तुमच्या क्रेडिट कार्डमधून 102 रुपयांचं पेमेंट करावं लागणार आहे. हा नियम आधी 9 ऑक्टोबरपासून लागू होणार होता.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

IPL 14 Mumbai Indians संघाची नवी जर्सी लॉन्च

Web News Wala

रेल्वे वाहतुकीच्या नियोजनासाठी 139 क्रमांकाची सुरुवात

Web News Wala

अग्रणी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाला राष्ट्रीय जल पुरस्कार

Team webnewswala

1 comment

Online Shopping करताना सावधान नकली सामान देऊन फसवणूक - Team WebNewsWala October 17, 2020 at 4:16 pm

[…] हे वाचा – आता Paytm वरून पेमेंट करणं महागणार… […]

Reply

Leave a Reply