Team WebNewsWala
नाटक शहर

आता केवळ 100 रुपयांत घ्या नाटकाचा आनंद

आता केवळ 100 रुपयांत घ्या नाटकाचा आनंद. प्रशांत दामले यांनी आपल्या नाटकांचे दर १०० रुपये ठेवण्याचा निर्णय घेतला.

आता केवळ 100 रुपयांत घ्या नाटकाचा आनंद

ठाणे – लॉकडाउननंतर नाट्यगृहे पुन्हा सुरु झाली आहेत. मात्र नवीन नियमांनुसार मर्यादीत संख्या आणि एकंदरितच नाटकांची तिकीटं ही महागडी असल्याने अनेकदा इच्छा असूनही सर्वसामन्य मराठी कुटुंबातील व्यक्ती नाटक पाहण्यासाठी जात नाही. सहकुटुंब नाटक पाहण्यासाठी जाणं म्हणजे एक हजारांहून अधिक खर्च तर केवळ तिकीटांवर होतो. हीच अडचण लक्षात घेत अभिनेते प्रशांत दामले यांनी एक अभिनव उपक्रम सुरु केला असून त्यांनी प्रायोगिक तत्वावर आपल्या नाटकांचे तिकीट दर १०० रुपये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील माहिती दामले यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून दिलीय.

अनेक नाट्यरसिकांनी मला संपर्क करून सांगितले की आम्हाला सहकुटुंब नाटक बघण्याची इच्छा आहे परंतु तिकीट दर जरा जास्त असल्यामुळे आम्ही पाहू शकत नाही.” म्हणूनच मी असा निर्णय घेतला आहे की बाल्कनीचा तिकीट दर जो आधी ३०० रुपये आणि आणि २०० रुपये होता, तो आता फक्त १०० रुपये ठेवण्यात येणार आहे,” अशी घोषणा प्रशांत दामलेंनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून केलीय.

प्रायोगिक तत्वावर केवळ गडकरी रंगायतनमध्ये केवळ 100 रुपयांत घ्या नाटकाचा आनंद

सध्या प्रायोगिक तत्वावर केवळ गडकरी रंगायतनमध्ये दोन प्रयोगांसाठी हे दर ठेवण्यात येणार आहेत. यापैकी पहिला प्रयोग हा ‘तु म्हणशील तसं‘ नाटकाचा असून तो २६ मार्च रोजी रात्री साडेआठ वाजता आहे. या नाटकाची तिकीट विक्री सुरु झाली आहे. तर दुसरा प्रयोग ‘एका लग्नाची पुढची गोष्ट‘ चा असून तो २८ मार्च रोजी सायंकाळी साडेचार वाजता आहे. या नाटकाची तिकीट विक्री आजपासून सुरु होत आहे. विशेष म्हणजे ही सवलतीच्या दरातील तिकीटं बुकमायशो या वेबसाईटवर उपलब्ध होणार नसून थेट नाटगृहामधूनच ही सवलतीच्या दरातील तिकीटं विकत घेता येणार आहेत, असंही प्रशांत दामलेंनी स्पष्ट केलं आहे.

प्रयोग यशस्वी झाला तर मुंबईतील सर्व नाट्यगृहांमध्ये याच पद्धतीने प्रयोग

पुढे बोलताना प्रशांत दामले यांनी, “हा प्रयोग जर यशस्वी झाला तर हळू हळू मुंबईतील सर्व नाट्यगृहांमध्ये याच पद्धतीने प्रयोग करीन,” अशा शब्द नाट्यरसिकांना दिलाय. त्याचप्रमाणे त्यांनी आपल्या पोस्टच्या शेवटी, ‘एकमेका सहाय्य करू अवघे उचलून धरू नाटक‘ असं आवाहन नाट्यरसिकांना केलं आहे.

नाट्यरसिकांचा सकारात्मक प्रतिसाद दिला

अनेक नाट्यरसिकांनी या पोस्टवर सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यावरुनच प्रशांत दामले यांनी, “मलाही हुरूप आला तुमच्या प्रतिक्रिया वाचुन,” असं कमेंट करुन म्हटलं आहे. त्याचप्रमाणे त्यांनी, “ही पोस्ट जेवढी व्हायरल करता येईल तेवढी करावी. म्हणजे आपल्याला जास्तीस जास्त रसिकांपर्यंत वेळेत पोचता येईल,” असं आवाहनही चाहत्यांना केलं आहे.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

विक्रम गोखले यांच्यासह 14 जणांवर फसवणुकीचा गुन्हा

Team webnewswala

भिवंडी – गॅरेज मध्ये घुसलेल्या सापाची सर्पमित्रांकडून सुटका

Web News Wala

Maha NGO चा स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ पुरस्कार आणि जीवन गौरव पुरस्कार सोहळा संपन्न

Web News Wala

Leave a Reply