Team WebNewsWala
Other तंत्रज्ञान व्यापार

सॅमसंग मोबाईल चा मोठा निर्णय, फोन मिळणार चार्जर शिवाय

सॅमसंग मोबाईल संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार काही स्मार्टफोनसोबत पुढील वर्षापासून चार्जर न देण्याची योजना सॅमसंगकडून आखली जात आहे.

सॅमसंग मोबाईल संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार काही स्मार्टफोनसोबत पुढील वर्षापासून चार्जर न देण्याची योजना सॅमसंगकडून आखली जात आहे. जर सॅमसंगने असा निर्णय घेतला तर कंपनीचे फोन पहिल्यांदाच चार्जरशिवाय विकले जातील.

यामागे पूर्णपणे आर्थिक विचार असल्याचे म्हटले जात आहे. जगातील सर्वात मोठ्या स्मार्टफोन निर्मिती कंपन्यांमध्ये सॅमसंगची गणती होते. दरवर्षी कोट्यावधी फोन्सची कंपनी विक्री करते.

या फोनसोबत चार्जर न दिल्यास कंपनीला आर्थिक फायदा होईल. त्यामुळे फोनची किंमत कमी होऊन त्याचा फायदा ग्राहकांना देता येईल, असा विचार कंपनीकडून सुरू आहे.

जगभरात सध्याच्या घडीला विकल्या जाणाऱ्या स्मार्टफोन्सचे चार्जिंग पोर्ट्स जवळजवळ एकसारखेच असतात. यूएसबी-सी पोर्ट चार्जिंग पोर्ट्सचे फोन सगळ्याच कंपन्या तयार करतात.

Samsung Phone Without charger

याच मुद्द्याचा फायदा घेण्याच्या तयारीत सॅमसंग आहे. चार्जरशिवाय फोन विकण्याच्या विचारात असलेली सॅमसंग ही पहिली कंपनी नाही. आयफोन १२ ची सीरिज अ‍ॅपलकडूनही विना चार्जर बाजारात लॉन्च करण्याचा विचार सुरू आहे.

सध्या बाजारपेठे उपलब्ध असलेल्या सगळ्याच फोनचे चार्जिंग पोर्ट्स जवळपास एकसारखेच असल्यामुळे एक चार्जर अनेक मोबाईलसाठी वापरला जाऊ शकतो. सॅमसंगकडून याचाच फायदा घेण्याचा विचार सुरू आहे.

आयफोन १२ सीरिज चार्जरशिवाय आणण्याच्या विचारात अ‍ॅपल असल्यामुळे सॅमसंगदेखील अशाच प्रकारचा निर्णय घेऊ शकते.

हे ही वाचा

चीनी वस्तुंना विरोध केवळ दिखावा दोन मिनिटांत 1.5 लाख चिनी मोबाईलची बुकिंग

पाकिस्तानचा चीनला मोठा झटका चीनच्या अ‍ॅपवर घातली बंदी

नेपाळचा भारतीय वृत्तवाहिन्यांवर सर्जिकल स्ट्राईक

अ‍ॅपबंदीला वैतागली ByteDance अमेरिकेला विकणार टीक-टॉक ?

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

धक्कादायक सलमानला मारण्यासाठी शार्पशूटर मुंबईत

Team webnewswala

एका कंपनी मुळे झाला जगातील इंटरनेट ठप्प

Web News Wala

दलेर मेहंदीच्या Tunak Tunak Tun गाण्यावर परदेशी ठुमके

Team webnewswala

3 comments

भारत 2G मुक्त करण्यासाठी पावलं उचलण्याची वेळ मुकेश अंबानी - Web News Wala August 2, 2020 at 1:00 pm

[…] सॅमसंग चा मोठा निर्णय, फोन मिळणार चार्… […]

Reply
अमित शाह यांना करोनाची लागण - Web News Wala August 2, 2020 at 5:14 pm

[…] सॅमसंग चा मोठा निर्णय, फोन मिळणार चार्… […]

Reply
चिनी स्मार्टफोनला भारतीय ‘लावा’ची टक्कर - Web News Wala August 2, 2020 at 8:02 pm

[…] सॅमसंग चा मोठा निर्णय, फोन मिळणार चार्… […]

Reply

Leave a Reply