Team WebNewsWala
ऑटो तंत्रज्ञान राष्ट्रीय

रेल्वे वाहतुकीच्या नियोजनासाठी 139 क्रमांकाची सुरुवात

रेल्वे मंत्रालयाने देशभर कोणालाही रेल्वेने माल पाठवायचा असेल, तर एकच राष्ट्रीय नंबर 139 या क्रमांकाने जाहीर केला.

रेल्वे वाहतुकीच्या नियोजनासाठी 139 क्रमांकाची सुरुवात

नवी दिल्ली – मालवाहतुकीचे अथवा अवजड सामुग्रीच्या वाहतुकीचे सर्वात स्वस्त, किफायती आणि विश्‍वसनीय नाव म्हणजे रेल्वे मालगाडी. आता रेल्वे मंत्रालयाने देशभर कोणालाही रेल्वेने माल पाठवायचा असेल, तर एकच राष्ट्रीय नंबर 139 या क्रमांकाने जाहीर केला असून मालवाहतूक यंत्रणेचे सुसूत्रीकरण आणि सुलभीकरण केले आहे.

139 क्रमांक डायल केल्यास रेल्वे पार्सल सुविधेची सर्व माहिती

आपले पार्सल, शेतमाल अथवा घरसामान दुसऱ्या गावात न्यायचे असेल, तर अशा ग्राहकांनी अथवा कंपन्यांनी फक्त 139 क्रमांक डायल केल्यास त्यांना दोन्ही ठिकाणांमधील अंतर, वजन अथवा आकारमानानुसार पार्सल वाहतुकीचे दर, जवळची रेल्वे स्थानके आणि ऑनलाईन पेमेंटची सुविधा यासह पार्सल ट्रॅकिंगची लिंक अशा विविध अत्याधुनिक सुविधा दिल्या जाणार आहेत.

रेल्वेची राष्ट्रीय हेल्पलाईन 139

त्यासाठी इच्छुक ग्राहकांनी रेल्वेची राष्ट्रीय हेल्पलाईन असलेल्या 139 या क्रमांकाला डायल करुन नंतर 6 हा क्रमांक दाबायचा आहे. मग रेल्वे पार्सल सुविधेची सर्व माहिती येथे दिली जाईल, असे रेल्वे मंत्रालयाने कळवले आहे.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.comआमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

हिंमत असेल, तर आमीर खान विरुद्ध मोर्चा काढा

Web News Wala

Mann ki Baat 77 : देश 100 वर्षातील मोठ्या महामारीशी लढतोय

Web News Wala

केंद्र सरकारविरुद्ध २५ सप्टेंबर रोजी भारत बंदचा इशारा

Team webnewswala

Leave a Reply