मनोरंजन

निया शर्मा आणि अर्जुन बिजलानीच्या ‘Tum Bewafa Ho’ सॉंग Viral

निया शर्मा ही तिच्या हॉटनेसमुळे कायमच इंटरनेटवर चर्चेत राहते. आता निया तिच्या नव्या अल्बम सॉंग ‘Tum Bewafa Ho’ मुळे चर्चेत आलीय.
निया शर्मा आणि अर्जुन बिजलानीच्या ‘Tum Bewafa Ho’ सॉंग Viral
Webnewswala Online Team टीव्ही क्षेत्रातील ‘हॉट अ‍ॅण्ड ब्यूटीफुल’ अभिनेत्री आणि ‘जमाई राजा 2.0’ फेम निया शर्मा ही तिच्या हॉटनेसमुळे कायमच इंटरनेटवर चर्चेत राहते. आता निया तिच्या नव्या अल्बम सॉंग ‘Tum Bewafa Ho’ मुळे चर्चेत आलीय. या अल्बम सॉंगमध्ये निया टीव्ही क्षेत्रातीलच ‘हॅंडसम’ अभिनेता अर्जुन बिजलानी सोबत दिसून येतेय. अर्जुन आणि नियाचं हे ‘तुम बेवफा हो’ सॉंग खूपच इमोशनल आहे. दोघांचं हे नवं अल्बम सॉंग काल रिलीज करण्यात आलं. हे गाणं रिलीज होताच या गाण्याने युट्यूबवर धुमाकूळ घातलाय.

२४ तासांत 30 लाख पेक्षाही जास्त व्ह्यूव्स

निया शर्मा आणि अर्जुन बिजलानीचं हे इमोशनल सॉंग सध्या खूपच गाजत आहे. काल हे सॉंग रिलीज केल्यानंतर या गाण्याला प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. केवळ २४ तासांत या गाण्याला जवळजवळ ३० लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहीलं आहे.

निया आणि अर्जूनची जोडी प्रेक्षकांच्या मनात

निया आणि अर्जुनचं हे गाणं स्टेबिन बेन आणि पायल देव यांनी गायलं आहे. तर या गाण्याचे बोल कुणाल वर्मा यांनी लिहिले आहेत. या गाण्याच्या संगीतबद्दल सांगायचं झालं तर पायल देव यांनी या गाण्याला संगीत दिलेलं आहे. अगदी इमोशनल करून सोडणारं हे गाणं प्रेक्षकांच्या चांगलंच पसंतीस उतरत आहे. या गाण्यातील निया आणि अर्जूनची जोडी प्रेक्षकांच्या मनात बसली आहे.

अर्जून बिजलानीच्या वर्कफ्रेंटबद्दल बोलायचं झालं तर त्याने आतापर्यंत छोट्या पडद्यावर नागिन’, ‘इश्क में मरजवा’ सारख्या मालिकांमध्ये लीड रोल केलेले आहेत. तर नियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिने २०१० मध्ये ‘काली – एक अग्निपरीक्षा’ मालिकामधून टीव्ही क्षेत्रात डेब्यू केला होता. त्यानंतर ती ‘एक हजारों में मेरी बहना है’, ‘जमाई राजा’, ‘इश्क में मरजावां’, ‘नागिन’ यासारख्या मालिकांमधून घराघरांत पोहोचली. सोबतच नियाने रोहित शेट्टीच्या अ‍ॅडव्हेंचर रिअ‍ॅलिटी शो ‘खतरों के खिलाडी-मेड इन इंडिया’ चा खिताब देखील आपल्या नावावर केलाय.

Web Title – निया शर्मा आणि अर्जुन बिजलानीच्या ‘Tum Bewafa Ho’ सॉंग Viral ( Niya Sharma and Arjun Bijlani’s ‘Tum Bewafa Ho’ song goes viral )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

 

Related posts

नक्की काय आहे शिवनागम मुळी म्हणुन पहिला जाणारा व्हिडिओ

Team webnewswala

बिग बॉस 14 मध्ये दोन नवे स्पर्धक करणार एण्ट्री

Team webnewswala

वैशाली माडे चा राष्ट्रवादी प्रवेश, दिली महत्वाची जबाबदारी

Web News Wala

Leave a Reply