मनोरंजन

‘तुझ्या इश्काचा नादखुळा’, रांगड्या प्रेमाची हळवी गोष्ट

स्टार प्रवाहवर २१ डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या ‘तुझ्या इश्काचा नादखुळा’ या नव्या मालिकेतून अशीच एक हटके लव्हस्टोरी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

स्टार प्रवाहवर २१ डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या ‘तुझ्या इश्काचा नादखुळा’ या नव्या मालिकेतून अशीच एक हटके लव्हस्टोरी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘लाख लाख चेह-यात एक चेहरा तुझा

बाकी सारं झूट एक नाद हा खरा तुझा

सखे तुला काय म्हनू आभाळाचा चांद जनू

शिवारात आला, जिव्हारीच लागल्या झळा

तुझ्या इश्काचा नाद खुळा, नाद खुळा…’

प्रेमाने भरलेल्या या ओळी खूप काही सांगून जातात.

साधा-सरळ, मनमिळाऊ, नम्र, सगळ्यांशी प्रेमाने वागणारा नवरा हवा अशी प्रत्येक मुलीची इच्छा असते. स्वातीदेखील याला अपवाद नाही. साधाभोळा आणि नऊ ते पाच अशी नोकरी करणाऱ्या मुलाशीच मी लग्न करणार या मतावर स्वाती ठाम असते. तर स्वातीवर जीवापाड प्रेम करणारा रघू मात्र याच्या परस्पर विरोधी स्वभावाचा. रघू फक्त एकदाच सांगतो नाहीतर सरळ उलटा टांगतो हे ब्रीदवाक्य घेऊन मनमौजी जगणारा. असे हे दोन विरुद्ध स्वभावाचे स्वाती आणि रघू एकमेकांच्या प्रेमात पडणार का? याची गोष्ट म्हणजे तुझ्या इश्काचा नादखुळा ही नवी मालिका.

या मालिकेविषयी सांगताना स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, “रांगड्या प्रेमाची हळवी गोष्ट म्हणजे तुझ्या इश्काचा नादखुळा ही मालिका. दिलखुलास आणि बिनधास्त. असा हिरो आणि असं जग बऱ्याच दिवसांनी रसिकांच्या भेटीस येणार आहे. स्टार प्रवाह वाहिनी सतत वेगळ्या धाटणीच्या गोष्टी सादर करत आहे. तुझ्या इश्काचा नादखुळा अशीच एक फ्रेश लव्हस्टोरी आहे. वेगवान कथानक आणि ट्विस्ट्स अँड टर्न्सच्या माध्यमातून रसिकांसमोर हुरहूर लावणाऱ्या तडकेबाज लव्हस्टोरीचा आनंद प्रेक्षकांना घेता येईल.”

संचित चौधरी आणि अक्षया हिंदळकर ही नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला

अभिनेता संचित चौधरी आणि अक्षया हिंदळकर ही नवी जोडी या मालिकेच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्टार प्रवाह प्रस्तुत या मालिकेची निर्मिती महेश तागडे यांच्या टेल अ टेल निर्मिती संस्थेअंतर्गत करण्यात आली आहे. ही नवी मालिका २१ डिसेंबरपासून रात्री १०.३० वाजता स्टार प्रवाहवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

पडद्यामागच्या कलाकारांना मदत करणाऱ्या प्रशांत दामले, सुभाष घई यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार

Team webnewswala

रामदेव बाबा नी मारल्या 10 सेकंदात 18 दोरीच्या उड्या

Team webnewswala

वैशाली माडे चा राष्ट्रवादी प्रवेश, दिली महत्वाची जबाबदारी

Web News Wala

Leave a Reply