Team WebNewsWala
तंत्रज्ञान मनोरंजन

Netflix करणार व्हिडिओ गेमिंग मार्केटमध्ये प्रवेश

व्हिडिओ स्ट्रिमिंगशिवाय व्हिडिओ गेमिंगमध्येही नशीब आजमावण्याची Netflix ची इच्छा आहे. गेमिंग बाजार झपाट्याने वाढत असतानाच Netflix ने हा निर्णय घेतला

Netflix करणार व्हिडिओ गेमिंग मार्केटमध्ये प्रवेश

Webnewswala Online Team –  व्हिडिओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स (Netflix) लवकरच व्हिडिओ गेमिंग मार्केटमध्येही प्रवेश करणार आहे. माध्यमांत प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, व्हिडिओ स्ट्रिमिंगशिवाय व्हिडिओ गेमिंगमध्येही नशीब आजमावण्याची Netflix ची इच्छा आहे. महत्वाचे म्हणजे, गेमिंग बाजार अत्यंत झपाट्याने वाढत असतानाच Netflix ने हा निर्णय घेतला आहे.

कोरोना महामारीमुळे लोक घरात कैद आहेत. यामुळेही गेमिंग मार्केट सध्या टॉपवर आहे.

Netflix ची गेमिंग कंपन्यांसोबत चर्चा सुरू 

एवढेच नाही, तर Netflix अॅपलचे सब्सक्रिप्शन, जसे Apple Arcade प्रमाणे, गेमिंगसाठी अनेक कंपन्यांसोबत सल्ला-मसलत करत आहे. याच बरोबर, नेटफ्लिक्सच्या गेमिंगमध्ये जाहिरात नसेल. तर ही एक सब्सक्रिप्शनवर आधारित गेमिंग सर्व्हिस असेल, असेही म्हटले जात आहे.

गेमिंग शिवाय, Netflix आपल्या व्हिडिओ स्ट्रिमिंग सर्व्हिसमध्ये आणखी एक नवा प्लॅन जोडणार असल्याचेही समजते. याला ‘N-Plus’, असे नाव देण्यात येईल. यात युधर्सना podcasts, कस्टम टीव्ही शो प्लेलिस्ट आणि बिहाइंड द सीन कंटेंट बघायला मिळेल. या सब्सक्रिप्शन प्लॅनसाठी कंपनी आपल्या काही यूझर्सकडून फीडबॅकदेखील घेत आहे.

Web Title – Netflix करणार व्हिडिओ गेमिंग मार्केटमध्ये प्रवेश ( Netflix will enter the video gaming market )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

 

Related posts

आता WhatsApp वरुन देखील पैसे पाठवता येणार

Web News Wala

Multi Device Support एकावेळी 4 फोन्समध्ये वाप WhatsApp

Web News Wala

लवकरच सात नवीन मार्गांवर देखील धावणार बुलेट ट्रेन

Team webnewswala

Leave a Reply