Team WebNewsWala
Other तंत्रज्ञान मनोरंजन

Netflix आणणार स्वस्त मस्त Mobile+ प्लान

Netflix will bring cheap cool Mobile + plan for online viewers

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश लॉकडाऊन असल्यामुळे आपल्यापैकी बरेच जण घरातच अडकून पडलेले आहेत. त्यात टीव्हीवर असलेल्या मालिकांचे रिपीट टेलिकास्टमुळे बरेच जण कंटाळले आहेत.

त्यामुळेच आपल्या काहीजणांनी ओटीटी प्लॅटफॉर्मचा आधार घेत घरबसल्या मनोरंजनचा आधार घेत आहे. या दरम्यान नेटफ्लिक्स मनोरंजनाचा अड्डा बनला आहे.

वेब सीरिजनंतर आता लवकरच नेटफ्लिक्सवर बॉलिवूडचे बिग बजेट चित्रपटही रिलीज होणार आहेत. अशात कंपनी सतत नवनवीन स्वस्त प्लॅन्सची घोषणा करत आहे.

Netflix will bring cheap cool Mobile + plan for online viewers

आता मिळालेल्या नव्या माहितीनुसार सध्या भारतात 349 रुपयांच्या नवीन “Mobile+” प्लॅनची नेटफ्लिक्स टेस्टिंग घेत आहे. याद्वारे हाई-डेफिनेशन (HD) व्हिडिओचा अ‍ॅक्सेस केवळ मोबाइलवरच नव्हे तर PC, Mac आणि Chromebook वरही मिळेल. पण, एकावेळेस फक्त एकाच युजरला हा प्लॅन वापरता येणार आहे.

स्मार्टफोनवर कोणालाही नेटफ्लिक्सचा आनंद घेता यावा यासाठी आम्ही भारतात मोबाइल प्लॅनची सुरूवात केली आहे. जर युजर्सचा अ‍ॅड चॉइसला [मोबाइल+ प्लॅन] चांगला प्रतिसाद असेल तरच हा प्लॅन आम्ही जास्त काळासाठी रोलआउट करू, असे या प्लॅनबाबत माहिती देताना कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

Netflix will bring cheap cool Mobile + plan for online viewers

“Mobile+” नावाने हा प्लॅन असला तरी युजर्स नेटफ्लिक्स कॉम्प्युटरवरही बघू शकतील. एकाच व्यक्तीच्या वापरासाठी मोबाइल+ आहे. एकापेक्षा जास्त व्यक्तींना या प्लॅनवर नेटफ्लिक्सचा वापर करता येणार नाही.

टेस्टिंगसाठी सध्या हा 349 रुपयांचा प्लॅन काही निवडक युजर्ससाठीच उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

हे ही वाचा
चीनी वस्तुंना विरोध केवळ दिखावा दोन मिनिटांत 1.5 लाख चिनी मोबाईलची बुकिंग
सुशांतच्या आयुष्यावर आधारित Suicide or Murder चा फर्स्ट लूक रिलीज
पाकिस्तानचा चीनला मोठा झटका चीनच्या अ‍ॅपवर घातली बंदी
नेपाळचा भारतीय वृत्तवाहिन्यांवर सर्जिकल स्ट्राईक
अ‍ॅपबंदीला वैतागली ByteDance अमेरिकेला विकणार टीक-टॉक ?

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

दिवाळीत सोन्याचे दर स्वस्त होणार की महाग ?

Team webnewswala

IRCTC चे i Pay लाँच लगेचच मिळणार रिफंड

Web News Wala

येऊर जंगलात भरकटले युवक, शोध घेण्यास यश

Team webnewswala

2 comments

URL September 15, 2020 at 5:27 am

… [Trackback]

[…] There you will find 32249 more Infos: webnewswala.com/news/netflix-will-bring-cheap-cool-mobile-plan-for-online-viewers/ […]

Reply
नोकरीची सुवर्णसंधी SBI मध्ये 4 हजार पदांसाठी भरती - Team WebNewsWala September 18, 2020 at 11:18 pm

[…] Netflix आणणार स्वस्त मस्त Mobile+ प्लान  […]

Reply

Leave a Reply