Team WebNewsWala
तंत्रज्ञान मनोरंजन व्यापार

NetFlix मुंबईत उभारणार जगातील पहिला स्टुडीओ

डिजिटल मनोरंजन जगात एक नंबरवर असलेली ओटीटी कंपनी नेटफ्लिक्स मुंबईत जगातील पहिला स्टुडीओ उभारणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

NetFlix मुंबईत उभारणार जगातील पहिला स्टुडीओ

Webnewswala Online Team – OTT बाजारात तगडी स्पर्धा निर्माण झाली असतानाच या बाजारातील भारताचे वाढते वर्चस्व लक्षात घेऊन डिजिटल मनोरंजन जगात एक नंबरवर असलेली ओटीटी कंपनी नेटफ्लिक्स मुंबईत जगातील पहिला स्टुडीओ उभारणार असल्याचे स्पष्ट केले आहे. कंपनीने प्रथमच भारतात गेल्या दोन वर्षात विविध भाषातील कंटेंट तयार करणे आणि खरेदी करण्यासाठी ३ हजार कोटींची गुंतवणूक केल्याचे मान्य केले आहे.

प्रीमियम ओटीटी कंटेंट मध्ये कंपनी सर्वात पुढे

NetFlix जगात ओटीटी मधील आघाडीची कंपनी आहे. अन्य कंपन्यांच्या तुलनेत त्यांचे मासिक तसेच वार्षिक दर अधिक असूनही कंपनीने पहिले स्थान कायम राखले आहे. प्रीमियम ओटीटी कंटेंट मध्ये कंपनी सर्वात पुढे आहे. भारतात या कंपनीने त्यांच्या कामाची सुरवात पाच वर्षापूर्वीच केली आहे पण आजपर्यंत त्यांनी ग्राहक संख्या किंवा गुंतवणूक याविषयी कोणतीही माहिती जाहीर केलेली नव्हती असे समजते.

यंदा प्रथमच कंपनीने अशी आकडेवारी जाहीर केली आहे. कंपनीने कंटेंट साठी केलेल्या ३ हजार कोटींच्या गुंतवणुकीत ४१ वेब सिरीज आणि फिल्म्स समाविष्ट आहेत. मुंबईत कंपनी त्यांचा पहिलाच लाईव्ह अॅक्शन फुल सर्व्हिस पोस्ट प्रोडक्शन स्टुडीओ उभारत असून हा स्टुडीओ पुढील वर्षी जून पर्यंत कार्यान्वित होणार आहे. यामुळे भारतीय कथा जागतिक पातळीवर पोहोचण्यास मदत होईल असे सांगितले जात आहे.

Web Title – NetFlix  मुंबईत उभारणार जगातील पहिला स्टुडीओ ( Netflix to set up world’s first studio in Mumbai )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

 

Related posts

‘Tarzan’ फेम Joe Lara चा विमान अपघातात मृत्यू

Web News Wala

स्वप्निल बांदोडकर चा ती रसिकांच्या भेटीला

Team webnewswala

फेसबुक मॅसेंजरवर स्क्रीन शेअरिंग सुविधा

Team webnewswala

Leave a Reply