Team WebNewsWala
आंतरराष्ट्रीय

नेपाळचे पंतप्रधान K P Oli ची पक्षातून हकालपट्टी

नेपाळ कम्युनिस्ट पक्षाच्या फुटीर गटाने रविवारी पंतप्रधान K P Oli यांची पक्षाच्या सर्वसाधारण सदस्यपदावरून हकालपट्टी केली असल्याचे वृत्त.

काठमांडू : नेपाळमध्ये पुष्पकमल दहल प्रचंड यांच्या नेतृत्वाखालील नेपाळ कम्युनिस्ट पक्षाच्या फुटीर गटाने रविवारी पंतप्रधान K P Oli यांची पक्षाच्या सर्वसाधारण सदस्यपदावरून हकालपट्टी केली असल्याचे वृत्त माध्यमांनी दिले. यापूर्वी या गटाने K P Oli यांना पक्षाध्यक्षपदावरून हटवले होते.

सर्वसाधारण सदस्य म्हणून हटवण्याचा निर्णय

K P Oli यांच्या अलीकडच्या कृतींबाबत पक्षनेतृत्वाने त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागवले होते. मात्र त्यांनी स्पष्टीकरण न दिल्यामुळे माजी पंतप्रधान प्रचंड व माधवकुमार नेपाळ यांच्या नेतृत्वाखालील गटाच्या स्थायी समितीच्या बैठकीत ओली यांना सर्वसाधारण सदस्य म्हणून हटवण्याचा निर्णय घेण्यात आला, असे ‘दि हिमालयन टाइम्स’च्या वृत्तात म्हटले आहे. प्रचंड यांच्या नेतृत्वाखालील गटाने पंतप्रधानांच्या बालुवाटार येथील निवासस्थानी हकालपट्टीचे पत्र नेऊन दिले. ओली हे पक्षाचे नियम मोडीत  असल्याचा आरोप आहे.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

अंबानी कुटुंब आशियातील दुसर्‍या श्रीमंत व्यक्तीपेक्षा दुप्पट श्रीमंत

Team webnewswala

मॉरिशस तेल गळती जपानी जहाजाचे झाले दोन तुकडे

Team webnewswala

२०२१ असणार भयानक, बाबा वेंगा ची भविष्यवाणी

Web News Wala

Leave a Reply