आंतरराष्ट्रीय राजकारण

नेपाळची संसद विसर्जित, एप्रिलमध्ये निवडणूक

राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांनी नेपाळची संसद विसर्जित केली. नेपाळची संसद विसर्जित झाल्यानंतर नेपाळमध्ये एप्रिल-मे २०२१ मध्ये निवडणूक होईल,

काठमांडू : राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांनी नेपाळची संसद विसर्जित केली. नेपाळची संसद विसर्जित  झाल्यानंतर नेपाळमध्ये एप्रिल-मे २०२१ मध्ये दोन टप्प्यात निवडणूक होईल, असे जाहीर करण्यात आले. याआधी पंतप्रधान खड्गप्रसाद शर्मा ओली (Nepal Prime Minister KP Sharma Oli / केपी शर्मा ओली) यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रीमंडळाची बैठक झाली. या बैठकीत संसद विसर्जित करण्याची शिफारस करण्याचा निर्णय झाला. ही शिफारस राष्ट्रपतींना पाठवण्यात आली. राष्ट्रपतींनी मंत्रीमंडळाच्या शिफारशीला मंजुरी दिली.

नेपाळची संसद विसर्जित, एप्रिलमध्ये निवडणूक

मंत्रीमंडळाच्या शिफारशीला मंजुरी देण्याचे अधिकार राष्ट्रपतींकडे आहेत. या अधिकारांचा वापर करुन संविधानाच्या कलम ७६ (१) आणि (७) तसेच कलम ८५ अंतर्गत राष्ट्रपतींनी मंत्रीमंडळाची शिफारस मंजूर केली आणि संसद विसर्जित केली. नेपाळमध्ये एप्रिल-मे २०२१ मध्ये दोन टप्प्यात निवडणूक होणार आहे. पहिल्या टप्प्याचे मतदान ३० एप्रिल आणि दुसऱ्या टप्प्याचे मतदान १० मे रोजी होणार आहे.

संसद विसर्जित केल्याचे तसेच निवडणुकीचे वेळापत्रक अधिकृतरित्या जाहीर झाले. यामुळे नेपाळमध्ये निवडणुका डोळ्यापुढे ठेवून राजकीय आरोप-प्रत्यारोपांची राळ उडणार हे निश्चित झाले. नेपाळची संसद विसर्जित झाल्यानंतर काळजीवाहू पंतप्रधान खड्गप्रसाद शर्मा ओली यांनी काठमांडूतील बंदोबस्तात वाढ केली. काठमांडूतील सर्व प्रमुख ठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. पोलिस नागरिकांची कसून तपासणी करत आहेत. प्रमुख रस्त्यांवर नाकाबंदी करुन वाहनांची तपासणी सुरू आहे. महत्त्वाच्या सरकारी इमारतींमध्ये कसून तपासणी झाल्यानंतरच प्रवेश दिला जात आहे.

सात मंत्र्यांचा राजीनामा

ओली यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रीमंडळाची बैठक झाली. या बैठकीत संसद विसर्जित करण्याची शिफारस करण्याचा निर्णय झाला. यानंतर सात मंत्र्यांनी राजीनामा दिला. पण राष्ट्रपतींनी मंत्रीमंडळाची शिफारस मंजूर करुन संसद विसर्जित केली.

 भारत सरकारचे नेपाळमधील घडामोडींवर लक्ष

भारत सरकार नेपाळमधील घडामोडींवर लक्ष ठेवून आहे. अद्याप भारताकडून नेपाळच्या राजकीय घडामोडींवर अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. याआधी भारतीय प्रतिनिधींच्या ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान झालेल्या दौऱ्यांनी भारतासाठी नेपाळ आणि नेपाळसाठी भारत महत्त्वाचा असल्याचे अधोरेखीत केले. सर्वात आधी ऑक्टोबर महिन्यात भारतीय गुप्तचर संस्था ‘रॉ’चे (Research & Analysis Wing – RAW) प्रमुख सामंत कुमार गोयल (Samant Kumar Goel) नेपाळच्या दौऱ्यावर गेले होते. नेपाळ दौऱ्यात त्यांनी नेपाळचे पंतप्रधान खड्गप्रसाद शर्मा ओली (Nepal Prime Minister KP Sharma Oli / केपी शर्मा ओली) यांची काठमांडू येथे भेट घेतली होती. दोघांमध्ये एकांतात दीर्घकाळ चर्चा झाली होती.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

amzon ने आणली कर्नाटकाच्या झेंडयाची बिकिनी

Web News Wala

World record १,२,३… नव्हे तर १० मुलांना दिला जन्म

Web News Wala

इंधन दरवाढी विरोधात ममता बॅनर्जी यांचा इलेक्ट्रिक दुचाकी प्रवास

Web News Wala

Leave a Reply