Team WebNewsWala
अर्थकारण राष्ट्रीय

NCMC One Nation One Mobility Card पंतप्रधानांची योजना

नवी दिल्ली : नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प असून गेल्या वर्षी मार्च महिन्यांत तो सुरु करण्यात आला होता. मोदींनी सोमवारी दिल्ली मेट्रो एअरपोर्ट एक्सप्रेस लाईनसाठी देखील ही सेवा सुरु केली, यामुळे या प्रकल्पाला वेग मिळणार आहे. NCMC हा प्रकल्प ४ मार्च २०१९ रोजी भारतात सुरु झाला होता. ‘One Nation One Mobility Card’ अशी याची टॅगलाईन करण्यात आली होती.

NCMC कार्डबाबत १० महत्वाच्या बाबी जाणून घ्या
  1. नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) हे एक ओपन लूप कार्ड आहे. जे देशभरातील सर्व प्रकारच्या स्थानिक प्रवासासाठी आवश्यक आहे.
  2. हे ऑटोमॅटिक ऑपरेट होणारं कार्ड असून याला भारत सरकारच्या गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाची मान्यता आहे.
  3. ४ मार्च २०१९ रोजी हे कार्ड लाँच केलं गेलं याद्वारे वापरकर्त्याला विविध प्रकारची कमी किंमतीची पेमेंट्स करता येतात. यामध्ये प्रवास, स्मार्ट सिटीज, टोल, पार्किंग आणि इतर कमी किंमतीची दुकानदारांची पेमेंट्स यांचा समावेश आहे. म्हणजेच दिवसाची किरकोळ देयके याद्वारे देता येतात.
  4. भारत सरकारच्या गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाच्या (एमओएचयूए) माहितीनुसार या कार्डवर ग्लोबल वॉलेट किंवा कार्ड वॉलेटमध्ये पैसे साठवण्याची तरतूद आहे.
  5. या कार्डद्वारे टोल ट्रान्झिट, पार्किंग आदी विविध सुविधांसाठी संपर्कविरहित पेमेंटसाठी फोनमधील ग्लोबल वॉलेट अ‍ॅपचा वापर केला जाऊ शकतो.

NCMC कार्डबाबत महत्वाच्या बाबी जाणून घ्या
NCMC हा प्रकल्प ४ मार्च २०१९ रोजी भारतात सुरु झाला होता. ‘One Nation One Mobility Card’ अशी याची टॅगलाईन करण्यात आली होती.

6. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने स्थापन केलेल्या नंदन निलेकणी समितीने एनसीएमसीची कल्पना मांडली होती. गेल्या १८ महिन्यांत २३ बँकांनी एनसीएमसी रुपे डिबिट कार्डसाठी परवानगी दिली आहे. यामध्ये एसबीआय, युको बँक, कॅनरा बँक, पंजाब नॅशनल बँक आदी बँकांचा समावेश आहे. मेट्रोच्या प्रवासासाठीही हे कार्ड स्वॅप करता येणारं आहे.

7. युनियन आयडेंटिफिकेशन ऑथरिटी ऑफ इंडियाचे (यूआयएआय) माजी अध्यक्ष निलेकणी यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय समितीनेही रोख व्यवहाराची संख्या कमी करण्यासाठी सरकारकडून नागरिकांना देण्यात येणारी सर्व देयकं डिजिटल स्वरुपात करण्याचाही पर्याय दिला होता.

8. २०२२ पर्यंत एनसीएमसी सुविधा संपूर्ण दिल्ली मेट्रो नेटवर्कवर उपलब्ध होईल. एनसीएमसी सेवेमध्ये दिल्ली मेट्रोच्या संपूर्ण ४०० किमी क्षेत्राचा समावेश करण्यात येणार आहे.

9. मेट्रो स्थानकात प्रवेश आणि बाहेर पडण्याची एनसीएमसीने स्मार्टफोनच्या मदतीने परवानगी दिली आहे. यालाच स्वयंचलित भाडं संग्रहण (एएफसी) प्रणाली म्हणून ओळखले जाते.

10. संबंधित बॅंकांना त्यांचे डेबिट कार्ड एनसीएमसी सेवेशी जोडून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

एनएसीएमसी कार्ड दोन प्रकारे वापरता येतं. नेहमीच्या डेबिटकार्ड प्रमाणे तसेच स्थानिक वॉलेटप्रमाणंही त्याचा वापर करता येतो. याद्वारे कॉन्टॅक्टलेस पेमेंटही करता येतं. देशभरातील सर्व प्रकारच्या स्थानिक प्रवासासाठी हे एकमेव कार्ड वापरता येतं.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

उज्जैन महाकाल मंदिर सापडला अनमोल खजिना

Web News Wala

EMI Moratorium वर तारीख पे तारिख

Team webnewswala

पहिल्याच दिवशी Income Tax ची Website Crash

Web News Wala

1 comment

Mera Ration app घरबसल्या बघा तुमच्या रेशनकार्ड किती धान्य मिळणार - Team WebNewsWala April 26, 2021 at 11:01 am

[…] मोबाइल एप सरकारने सुरू केलेल्या वन नेशन वन रेशन कार्ड योजनेचा एक भाग आहे. या अ‍ॅपच्या […]

Reply

Leave a Reply