Other शहर शिक्षण

नाशिकचा आर्यन शुक्ल ज्युनिअर मेंटल मॅथ्स स्पर्धेत विश्वविजेता

गणिताचा जादूगार आर्यन शुक्ल याने जर्मनी येथे आयोजित जागतिक ज्युनिअर मेंटल मॅथ्स स्पर्धेत चमकदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावत िजेतेपद मिळविले

नाशिक :- येथील गणिताचा जादूगार आर्यन शुक्ल याने जर्मनी येथे आयोजित जागतिक ज्युनिअर मेंटल मॅथ्स स्पर्धेत चमकदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावत विश्वविजेतेपदाला गवसणी घातली आहे. भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत अवघ्या १० वर्ष वयात आर्यनने जागतिक स्तरावर अतिशय अवघड अशा मेंटल मॅथ्स विषयात विविध देशातील ६५ स्पर्धकांना मागे टाकत विजेतेपद मिळविले आहे.

जागतिक ज्युनिअर मेंटल मॅथ्स चॅम्पियनशिप दरवर्षी जर्मनी येथे भरविली जाते. यावर्षी कोरोनाच्या सावटाखाली स्पर्धा ऑनलाईन स्वरूपात आयोजित केली गेली. १२ वर्षाखालील वयोगटात एकूण ६५ स्पर्धकांनी भाग घेतला होता. यात भारत, बल्गेरिया, युएइ, दक्षिण आफ्रिका, सर्बिया, अल्जेरिया, बोस्निया अशा अनेक देशातील मेंटल कॅल्क्युलेटर सहभागी होते. भारतातील नामांकित प्रशिक्षक युझेबियस नोरोन्हा ( जिनियसकीड इंडिया संस्था ) यांच्या मार्गदर्शनाखाली आर्यनने स्पर्धेत भाग घेतला होता.

५० पैकी ५० गुण मिळवित अंतिम फेरीत दमदार प्रवेश

पात्रता फेरीत आर्यन शुक्ल “अ” गटातुन खेळत होता. एकूण १२ प्रश्न एकामागोमाग एक विचारले गेले ज्याचे उत्तर प्रत्येकी फक्त १५ सेकंदात “झूम”मिटिंग च्या माध्यमातून ऑनलाईन तात्काळ द्यायचे होते. आर्यन सर्व १२ प्रश्नांची उत्तरे अचूक देत ५० पैकी ५० गुण मिळवित अंतिम फेरीत दमदार प्रवेश केला.

अंतिम फेरीत एकूण १२ सर्वोत्तम स्पर्धकांनी स्थान मिळविले ज्यांची निवड पाच गटात सहभागी झालेल्या ६५ खेळाडू मधून झाली. अंतिम फेरीत १५ प्रश्न प्रत्येकी २५ सेकंद अशा स्वरूपात विचारले गेले. आर्यनने अतिशय कौशल्याने सर्व प्रश्नांची उत्तरे अचूक देत ७० पैकी ७० गुणांची कमाई करत निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आणि विश्वविजेतेपद भारतासाठी खेचून आणले.

अवघ्या काही सेकंदात विविध प्रकारचे अतिशय कठीण गणिताचे प्रश्न या स्पर्धेत विचारले गेले होते. ९ ते १२ आकडी संख्येचे घनमूळ, ५७२१४०९६ चे वर्गमूळ, मोठ्या संख्येचे गुणाकार (७८६९ X ९२३७), मोठ्या संख्येचा भागाकार , बेरीज आणि वजाबाकी, अपूर्णांक प्रश्न (५/६+ ६/११) अशा अनेक प्रश्नांचा सामना स्पर्धकांना एकामागोमाग करणे गरजेचे होते.

सर्वात लहान वयाचा पदक विजेता

आर्यन शुक्ल वयाच्या ६ व्या वर्षांपासून मेंटल मॅथ्सचे प्रशिक्षण जिनियस कीड येथे घेत आहे. प्रमुख प्रशिक्षक युझेबियस नोरोन्हा तसेच नाशिक मधील नितीन जगताप याच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण प्रशिक्षण आर्यन घेत आहे. २०१८ मध्ये तुर्की येथे मेमोरियाड मेंटल मॅथ्स ओपन चॅम्पियनशिप स्पर्धेत आर्यनने ७ सुवर्ण, १ रौप्य आणि २ कांस्यपदक जिंकत दोन किड्स विश्वविक्रम केले आहेत.

विशेष म्हणजे मागील महिन्यात लंडन येथे पार पडलेल्या मेंटल कॅल्क्युलेशन वर्ल्ड चॅम्पियनशिप २०२० स्पर्धेत आर्यन ने १७ वर्षाखालील ज्युनिअर गटात ब्रॉंझपदक पटकावत स्पर्धेच्या २३ वर्षाच्या इतिहासात सर्वात लहान वयाचा पदक विजेता होण्याचा पराक्रम केला होता. आता आर्यन शुक्ल ज्याने जर्मनी मधील ज्युनिअर मेंटल मॅथ्स स्पर्धेत सुवर्णपदक पटकावल्यानंतर आर्यन हा एकमेव भारतीय आहे ज्याने या दोन्ही स्पर्धेत पदक विजेता होण्याचा बहुमान मिळविला आहे.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

गोंडवाना विद्यापीठ ऑनलाइन परीक्षेचा निकाल जाहीर निकाल जाहीर

Team webnewswala

पर्यटनाला मिळणार चालना, मुंबई ते काशीद बोट सेवा होणार सुरू

Web News Wala

स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेला मंजुरी

Team webnewswala

Leave a Reply