पर्यावरण राजकारण शहर

पालिका आवारातील वृक्षांवर खिळे ठोकल्याचा प्रकार

मीरा-भाईंदर पालिका मुख्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी झाडांना खिळे ठोकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पालिकेच्या उद्यान विभागाच्या  आवारातच लागत असल्यामुळे पर्यावरण प्रेमी वर्गाकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

भाईंदर : मीरा-भाईंदर पालिका मुख्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी झाडांना खिळे ठोकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पालिकेच्या उद्यान विभागाच्या  आवारातच लागत असल्यामुळे पर्यावरण प्रेमी वर्गाकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

पालिका क्षेत्रात दोन लाखांहून अधिक झाडे आहेत. या वृक्षांच्या जतनासाठी पालिकेच्या वतीने मोठा खर्च करण्यात आला आहे. मात्र, पालिका आवारातील वृक्षसंपदा पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी महत्त्वाची ठरली असतानाही पालिकेच्याच एका विभागाने मुख्यालय आणि बाहेरील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी झाडांवरच सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत.

झाडांना खिळे ठोकल्याचा प्रकार उघडकीस मीरा-भाईंदर पालिकेच्या उद्यान विभागाचे मात्र दुर्लक्ष

वृक्षांची निगा राखण्यासाठी बहुतेक पालिकेतील उद्यान विभागाकडून मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात आली आहेत. त्यात रोपावस्थेत वा पूर्ण वाढ झालेल्या वृक्षांना कोणत्याही प्रकारची हानी पोहोचणारी नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना यात करण्यात आल्या आहेत. परंतु, मीरा-भाईंदर पालिका प्रशासनाच्या वतीने आवारातील झाडांना पोहोचविण्यात आलेल्या जखमांबाबत दुर्लक्ष करण्यात आले आहे.

झाडांच्या नुकसानीकडे दुर्लक्ष

मीरा-भाईंदर पालिकेकडून अनेकदा  धोरण निश्चित करण्यात आले आहे. परंतु , त्याची अमलबजावणी करण्यात न आल्याचा प्रकार उजेडात आला आहे. सार्वजनिक रस्ते, पदपथ, चौक, दुकानांसमोरील जागा, झाडे, पथदिव्यांच्या खांबांवर बेकायदा पद्धतीने जाहिराती लावल्या जात आहेत. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी याविरोधात आवाज उठवला होता. झाडांच्या संवर्धनाची मोहीम राबवली जात असताना झाडांच्या नुकसानीकडे लक्ष दिले गेले नसल्याचे मोईन सय्यद यांनी सांगितले.  याप्रकरणी पालिका प्रशासनाने माहिती घेऊन कारवाई करण्यात येईल, असे उत्तर दिले आहे.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

शहरात लवकरच धावणार 100 डबलडेकर बस

Team webnewswala

डिझायनर कारप्रेमींना धक्का, दिलीप छाबरियाला अटक

Web News Wala

हनुमान जयंती साठी राज्यशासनाकडून मार्गदर्शक सुचना जाहीर

Web News Wala

Leave a Reply