Team WebNewsWala
शहर शिक्षण समाजकारण

MumUni School of Thoughts – समाजाचे ऋण फेडण्याचा प्रयत्न

Mumuni School of Thoughts अकादमीच्या वतीने सुरु असलेल्या ऑनलाईन व्याख्यानमालेत रविवार दि.१३ सप्टेंबर, २०२० रोजी, झूम अ‍ॅपवर संध्याकाळी ५:०० वाजता प्रा. प्रतिभा कांबळे यांचे 'टाळेबंदी नंतरची अर्थव्यवस्था: स्वरूप आव्हाने व क्षमता' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

MumUni School of Thoughts ह्या अकादमीची स्थापना २४ मे २०२० रोजी मुंबई व उपनगरात राहाणाऱ्या विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या उच्चविद्याविभूषित समविचारी मित्रांनी आँनलाईन पद्धतीने केली.

करोनामुळे निर्माण झालेल्या आरोग्य आणीबाणीच्या काळात सारे व्यवहार ठप्प झाले. अशा परिस्थितीत मानवी विचारप्रक्रिया जाग्रुत राहावी व अधिक सम्रुद्ध व्हावी ह्या उद्देशाने मुमयुनी स्कूल आँफ थाँटस् ची स्थापना करण्यात आली आहे.

Man cannot live by bread alone. He has a mind which needs food for thoughts.” मानवी जीवनात विचारसत्वाची अत्यावश्यकता उद्ध्रुत करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विधान आपले क्रुतीवाक्य मानून विचारप्रवर्तनाचे कार्य करीत आहे.

विचारांद्वारे जीवनपरिवर्तन‘ हे ह्या अकादमीचे ध्येय व ब्रीदवाक्य आहे. पुरोगामी व नवनिर्मिती शील विचारांद्वारे समाजमनात सकारात्मक बदल घडवण्यास प्रयत्नशील असलेल्या विचारमनांना एकत्र जोडणे हे अकादमीचे मिशन आहे. अशा विचारमनांना मुक्त व निर्भीड विचारपीठ निर्माण करण्यास अकादमी कटिबद्ध आहे.

त्यानुसार विविध अभ्यासक्षेत्र, विषय व समकालीन घडामोडी यांची सखोल माहिती करून घेण्यासाठी दर रविवारी त्या क्षेत्रातील अनुभवी व तज्ज्ञ व्यक्ती चे व्याख्यान आयोजित केले जाते. चाळीस मिनिटांच्या व्याख्यानंतर तितकाच वेळ प्रश्नोत्तरांच्या सत्रासाठी दिला जातो ज्यात वक्ता व श्रोता यांचा थेट संवाद होतो. व्याख्यानाची भाषा मराठी असते.

प्रश्नोत्तराच्या सत्रात हिंदी व इंग्रजी भाषेचा समावेश असतो. दोन महिन्याच्या कालावधीत अकादमीने नऊ व्याख्याने व एका कविसंमेलनाचे आयोजन केले.

डॉ. श्रीधर पवार, निव्रूत्त वैद्यकीय अधिकारी, मुंबई मनपा यांच्या ‘करोनानंतरचा समाज’ या व्याख्यानाने व्याख्यानमालेला सुरुवात झाली. याच मालिकेत पुढे अनुक्रमे संशोधक सुवर्णा मोरे (आंबेडकरी चळवळ व स्त्री), सामाजिक व पर्यावरण कार्यकर्ते श्री. शशिकांत सोनावणे (टाळेबंदीनंतर सामाजिक व परिवर्तन वादी चळवळींवरील परिणाम), प्रा. डॉ. विलास पाध्ये (टाळेबंदीनंतर सामाजिक नातेसंबंधांवर होणारे परिणाम), प्रा. डॉ. राजेंद्र गोणारकर (टाळेबंदीदरम्यान माध्यमे जबाबदारी कडे दुर्लक्ष करीत विश्वासार्हता गमावत आहेत का?), श्री. प्रसाद मिरकले (महिला व बालकांच्या कल्याणासमोरील आव्हाने), प्रा. राहुल कोसंबी (आरक्षण: वास्तव आणि पेच), प्रा.केतन भोसले (भारत-चीन परराष्ट्र धोरण: इतिहास, वर्तमान व भविष्य) यांनी व्याख्याने झाली.

प्रशांत भालेराव, प्रा. प्रज्ञाकिरण वाघमारे, प्रफुल्ल सावंत, संदीप भांगरे, प्रशांत तायडे, प्रा. डॉ. अनिल साबळे, तुषार शेलार, हे मुमयुनी स्कूल आँफ थाँटस् चे संस्थापक सदस्य आहेत. अकादमीची प्रतिमा व कार्य अधिक लोकाभिमुख, स्वयंसेवी व अव्यवसायिक राखून गतीशील होण्याचे प्रयत्न केले जात आहेत.भविष्यात कलाक्षेत्रात सक्रिय होण्याचा मुमयुनी स्कूल आँफ थाँटस् चा मानस आहे.

संस्थापक सदस्य,
मुमयुनी स्कूल आँफ थाँटस्

संपर्क:
e-mail: mumunischoolofthoughts@gmail.com

Facebook Group: MumUni School Of Thoughts

हे ही वाचा
चीनी वस्तुंना विरोध केवळ दिखावा दोन मिनिटांत 1.5 लाख चिनी मोबाईलची बुकिंग
धोपेश्वर सचिव मनोहर भगवान नवरे यांचा अजब कारभार माहिती अधिकारबाबत अज्ञान
लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न द्या, शिवसैनिकानं थेट उद्धव ठाकरेंना लिहिलं रक्तानं पत्र
आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

पुण्यात सुरु झाले वॉरिअर आजीबाई चे मार्शल आर्ट्स क्लास

Team webnewswala

आंध्रप्रदेश-तेलंगणामध्ये मुसळधार पावसाचा कहर

Team webnewswala

पर्यटनाला मिळणार चालना, मुंबई ते काशीद बोट सेवा होणार सुरू

Web News Wala

9 comments

कोविड 19 सामाजिक जन जागृती अभियान अंतर्गत ऑनलाइन विचारमंथन - Web News Wala August 2, 2020 at 9:25 pm

[…] 19 सामाजिक जन जागृती अभियान अंतर्गत Mumuni School of Thoughts अकादमीच्या विद्यमाने ऑनलाइन […]

Reply
MumUni School Of Thoughts च्या वतीने अण्णा भाऊ साठे यांना मानवंदना - Web News Wala August 8, 2020 at 1:15 pm

[…] साठे यांच्या जन्मशताब्दी निमित्त MumUni School Of Thoughts अकादमीच्या वतीने त्यांना अनोखी […]

Reply
MumUni School of Thoughts तर्फे प्रा चौधरी यांचे अंतर्मुख करणारे व्याख्यान - Web News Wala September 12, 2020 at 1:04 pm

[…] MumUni School of Thoughts ह्या अकादमीच्या वतीने गेल्या तीन महिन्यापासून सुरु असलेल्या आँनलाईन व्याख्यानमालेत दि.३० आँगस्ट २०२० रोजी प्रा.अजय चौधरी यांचे ‘ज्ञानरचनेतील समस्या व आव्हाने: समाजशास्त्रीय द्रुष्टीकोण’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. […]

Reply
Mumuni School of Thoughts तर्फे 'अर्थ' पूर्ण व्याख्यानाचे आयोजन - Team WebNewsWala September 16, 2020 at 4:50 pm

[…] Mumuni School of Thoughts अकादमीच्या वतीने सुरु असलेल्या ऑनलाईन व्याख्यानमालेत रविवार दि.१३ सप्टेंबर, २०२० रोजी, झूम अ‍ॅपवर संध्याकाळी ५:०० वाजता प्रा. प्रतिभा कांबळे यांचे ‘टाळेबंदी नंतरची अर्थव्यवस्था: स्वरूप आव्हाने व क्षमता’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. […]

Reply
कोविड 19 सामाजिक जन जागृती अभियान अंतर्गत ऑनलाइन विचारमंथन - Team WebNewsWala September 18, 2020 at 11:49 pm

[…] 19 सामाजिक जन जागृती अभियान अंतर्गत Mumuni School of Thoughts अकादमीच्या विद्यमाने ऑनलाइन […]

Reply

Leave a Reply