Team WebNewsWala
Other अर्थकारण शिक्षण समाजकारण

Mumuni School of Thoughts तर्फे ‘अर्थ’ पूर्ण व्याख्यानाचे आयोजन

Mumuni School of Thoughts अकादमीच्या वतीने सुरु असलेल्या ऑनलाईन व्याख्यानमालेत रविवार दि.१३ सप्टेंबर, २०२० रोजी, झूम अ‍ॅपवर संध्याकाळी ५:०० वाजता प्रा. प्रतिभा कांबळे यांचे 'टाळेबंदी नंतरची अर्थव्यवस्था: स्वरूप आव्हाने व क्षमता' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

Mumuni School of Thoughts अकादमीच्या वतीने सुरु असलेल्या ऑनलाईन व्याख्यानमालेत रविवार दि.१३ सप्टेंबर, २०२० रोजी, झूम अ‍ॅपवर संध्याकाळी ५:०० वाजता प्रा. प्रतिभा कांबळे यांचे ‘टाळेबंदी नंतरची अर्थव्यवस्था: स्वरूप आव्हाने व क्षमता’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

प्रा. प्रतिभा कांबळे यांनी Mumuni School of Thoughts व्याख्यानाच्या सुरुवातीस गेल्या सहा वर्षातील राष्ट्रीय आणि जागतिक पातळीवरील राजकीय आणि आर्थिक घडामोडींचा भारतीय अर्थव्यवस्थेवरील परिणाम विशद केला.

केवळ कोविड-१९ ची साथ अर्थव्यवस्थेच्या दुरावस्थेस कारणीभूत नसून शासनाची अक्षम व अपूरक धोरण निश्चिती जबाबदार आहे. नोटबंदी, वस्तू आणि सेवा कर (G.S.T.), खाजगीकरण (Privatization), राजकोषीय तूट (Fiscal Deficit), यासारखे निर्णय व त्यांच्या अंमलबजावणीतील अपुरेपणा व अक्षमता यांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर दुष्परिणाम झाला आहे.

शासनाचे एकापाठोपाठ एक परिस्थितीशी असंबद्ध निर्णय, त्यांचा समाजघटकांवर होणारे दुष्परिणाम याचा न केलेला विचार, तज्ज्ञांच्या सल्ल्यांचा अभाव, अपुरा अभ्यास यांमुळे स्थूल राष्ट्रीय उत्पादनात (G.D.P.) -२४ एवढी घट झाली आहे असे मत प्रा. कांबळे यानी व्यक्त केले.

टाळेबंदी दरम्यान व टाळेबंदी पूर्वी नफा मिळवून देणा-या सरकारी कंपन्यांचे शेअर्स विकणे उदा. एल.आय.सी. तसेच सरकारी मालकीचे विमानतळ, रेल्वे, तेलकंपन्या, दूरसंचार (Telecom) कंपन्या यांचे खाजगीकरण करण्याची अजिबात आवश्यकता नव्हती उलट त्या क्षेत्रांना सरकारने स्वत:हून बळ देणे आवश्यक होते. नोटबंदीच्या निर्णयामुळे ८६% चलन पुनर्मुद्रित (Reprint) करावे लागले. याचा दुष्परिणामच दिसून आला. त्याचा फटका सूक्ष्म व लघुउद्योगांना इतका जबरदस्त बसला की त्यांना सावरणेही कठिण झाले आहे. अशा भयावह स्वरुपाच्या अर्थव्यवस्थेने तितकीच भयावह आव्हाने वर्तमानात व भविष्यात निर्माण केली आहेत. आधीच मोठ्या प्रमाणात असलेल्या बेरोजगारीत खाजगीकरणामुळे वाढ होणार आहे. खाजगीकरणामुळे वाढणारी नफेखोरी ही केवळ मूठभर लोकांसाठी असणार आहे. त्यामुळे गरीब घटक अधिक गरीब व श्रीमंत घटक अधिक श्रीमंत अशा ध्रुवीकरणामुळे आर्थिक व सामाजिक विषमता निर्माण होईल.

टाळेबंदी दरम्यान अनेक लोकांना बेरोजगार व्हावे लागले. उत्पन्नाचा स्त्रोत गमवावा लागला. त्याचा थेट परिणाम वस्तू व सेवांची मागणी कमी होण्यात झाला व त्याद्वारे पुरवठा, उत्पादन यात ओळीने घट झाली. हे दुष्टचक्र अर्थव्यवस्थेला अधिकच खिळखिळे करु शकते. शिक्षणव्यवस्थेवरही याचा दुष्परिणाम दिसून येतो. विद्यार्थ्यांमध्ये गळतीचे (Dropout) व शिक्षणापासून वंचित राहण्याचे प्रमाण गेल्या दोन ते तीन महिन्यात वाढल्याचे दिसत आहे.

अशा अवस्थेत अर्थव्यवस्थेला उभारी देणारे उपाय सुचविताना प्रा. कांबळे यांनी असे स्पष्ट केले की सूक्ष्म व लघुउदयोगांवर अधिक लक्ष केंद्रित करून त्यांना बळ देण्यासाठी खास पॅकेजेसची व्यवस्था करणे गरजेचे आहे. रेपो रेट व रिजर्व्ह रेट कमी करणे, सरकारी गुंतवणूक वाढविणे, पायाभूत सुविधांमध्ये (Infrasructure) अधिक गुंतवणूक करणे. समाजातील सर्वात वंचित घटकांना जगण्यासाठी बळ देईल अशी धोरणे तयार करणे व त्याची योग्य अंमलबजावणी युद्धपातळीवर करणे आवश्यक आहे असे सांगितले.
प्रा. कांबळे यांनी त्यांच्या सोप्या, ओघवत्या शैलीत अर्थशास्त्रीय संकल्पनांचा योग्य उपयोग करून सध्याच्या अर्थव्यवस्थेचे परखड विश्लेषण केले. या कार्यक्रमाची तांत्रिक बाजू Mumuni School of Thoughts या अकादमीचे प्रशासक श्री. प्रशांत भालेराव यांनी सांभाळाली.

संपूर्ण व्याख्यान पाहण्यासाठी कृपया या लिंकवर क्लिक करा – 

संपर्क –
mumunischoolofthoughts@gmail.com
आमच्याशी फेसबुक वर जुडण्यासाठी ह्या लिंकवर क्लिक करा: – https://www.facebook.com/groups/mumunischoolofthoughts/

अशा अधिक व्हिडिओंसाठी आमच्या YouTube चॅनेलला Subscribe करा – https://www.youtube.com/channel/UCgaosgZhoL8BglS5KJ6S0YQ

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

स्वदेशी कोवॅक्सिन च्या मानवी चाचणीचा पहिला टप्पा पूर्ण; अपेक्षेनुसार चाचणीचे निष्कर्ष

Team webnewswala

Laxmi Vilas Bank चं DBS बँकेत विलीनीकरण

cradmin

हार्वर्ड बिझिनेस स्कूल डीन पदी श्रीकांत दातार यांची नियुक्ती

Team webnewswala

Leave a Reply