Team WebNewsWala
शहर समाजकारण

मम्मीज बचत गट जागतिक कृषी महोत्सवाचा शुभारंभ

स्व. दीना बामा पाटील प्रतिष्ठान, संलग्न, मम्मीज बचत गट मार्गदर्शन केंद्र आयोजित जागतिक कृषी महोत्सवाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.

मुंबई : स्व. दीना बामा पाटील प्रतिष्ठान, संलग्न, मम्मीज बचत गट मार्गदर्शन केंद्र आयोजित,श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र दिंडोरी प्रणित जागतिक कृषी महोत्सव 2021 चा प्रारंभ भांडुप पश्चिम येथे मंगळवार दिनांक 26 जानेवारी रोजी, सकाळी 10 वा. एल.बी.एस. मार्ग, मेट्रो माॅल समोरील, मनोरमा महिला उद्योग भवन येथे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने जागतिक कृषी महोत्सवाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.

या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी महापौर किशोरी पेडणेकर आपल्या भाषणात म्हणाले, स्व. दीना बामा पाटील प्रतिष्ठान, संलग्न, मम्मीज बचत गट मार्गदर्शन केंद्राने नाव उज्ज्वल केले आहे
नव्या युगाचे नवे आव्हान पेलण्यासाठी कृषिविषयक तंत्रशुद्ध ज्ञानाची शिदोरी देण्याची गरज असून स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र दिंडोरी प्रणित सर्व सेवेकरी भक्तांनी जागतिक कृषी महोत्सवात सहभागी होऊन मोलाचं सहकार्य केले आहे .हि बाब निश्चितच कौतुकास्पद आहे. त्यासाठी माजी खासदार संजय पाटील व पल्लवी पाटील यांच्या कामाचे मी मनापासून कौतुक करते.
सर्वांना प्रशिक्षित करणे हि काळाची गरज असल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.

श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे कृषी आणि अध्यात्माचे धडे सर्वसामान्य तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचवून आजच्या युवा तरुण पिढीला योग्य दिशा देण्याचे काम पल्लवी पाटील सेवेच्या माध्यमातून करीत असल्याचे मत महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी व्यासपीठावर अँड. सुहास वाडकर, आमदार विभाग प्रमुख रमेश कोरगावकर, आमदार सुनिल राऊत, सभागृहनेते विशाखा राऊत, राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव, बाल कल्याण समिती अध्यक्ष राजराजेश्वरी रेडकर, एस आणि टी प्रभाग समिती अध्यक्ष दीपमाला बडे, नगरसेवक उमेश माने, नगरसेवक उपेंद्र सावंत, नगरसेविका दिपाली गोसावी माजी नगरसेवक सुरेश कोपरकर, विधानसभा संघटक संध्या वढावकर, सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे नरेंद्र राणे, भांडुप विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, उपविभाग प्रमुख ,महिला उपविभाग संघटक, शाखा समन्वयक, सर्व शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, गटप्रमुख, शिवसैनिक, युवासैनिक, मोठ्या संख्येने उपस्थित होते

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.comआमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

5 G प्रकरणी अभिनेत्री ‘जुही चावला’ ला 20 लाखांचा दंड

Web News Wala

मोदी काळात अदानी, अंबानी सह 4.12 लाख कुटुंबांना अच्छे दिन

Web News Wala

अत्रे नाट्यगृह वाहतुक लिफ्ट चे काम त्वरित करा – नीलम गोऱ्हे

Team webnewswala

Leave a Reply