Team WebNewsWala
तंत्रज्ञान शहर

मुंबईकरांचे Property Card आता eProperty card ॲपवर

भू कर क्रमांकनिहाय जमिनीचा तपशिल जमीनधारकांना आता घरबसल्या मोबाईल ॲपवर पाहता येणार आहे. त्यासाठी eProperty card हे ॲप विकसित.
मुंबईकरांचे Property Card आता eProperty card मोबाइल ॲपवर

मुंबई – मुंबई शहर जिल्ह्यातील 19 महसूल विभागांतर्गत जमिनींची मिळकत पत्रिका (Propertycard) आणि भू कर क्रमांकनिहाय जमिनीचा तपशिल जमीनधारकांना आता घरबसल्या मोबाईल ॲपवर पाहता येणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने ई-प्रॉपर्टी कार्ड eProperty card हे ॲप नागरिकांसाठी विकसित केले असून या ॲपचे मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी लोकार्पण केले. (Mumbai City Propertycard on Mobile App)

पुढील काळात संपूर्ण राज्यासाठी ॲप उपलब्ध

या ॲपची सुविधा मुंबई शहर जिल्ह्यासाठी असून पुढील काळात संपूर्ण राज्यासाठी ॲप उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. हे ॲप गूगल प्ले स्टोअरवर सहजरित्या उपलब्ध होणार आहे. या ॲपच्या माध्यमातून नागरिकांना किंवा जमीनधारकांना जमिनीचा नकाशा, सीटी सर्व्हे क्रमांक, जमिनीचे क्षेत्र आणि प्रकार, करनिर्धारणा तसेच जमीनधारकाची माहिती कळेल.

हे ॲप सर्वसामान्यांसाठी उपयोगी ठरणार असून जिल्हाधिकारी कार्यालयाने निर्मित केलेल्या या ॲपचा नागरिकांनी उपयोग करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी निवतकर यांनी यावेळी केले.

इज ऑफ डुईंग बिझनेस उपक्रमांतर्गत ePropertycard ॲपची निर्मिती

या ॲपची माहिती मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या mumbaicity.gov.in आणि prcmumbai.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. इज ऑफ डुईंग बिझनेस उपक्रमांतर्गत मुंबई शहर एनआयसीने ‘ई-प्रॉपर्टी कार्ड’ (eProperty card) या ॲपची निर्मिती केली असून जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी कविता पाटील आणि अतिरिक्त जिल्हा सूचना अधिकारी अनिल राठोड यांनी हे ॲप विकसित केले आहे.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

राणीची बाग १५ फेब्रुवारीपासून सर्वांसाठी खुली होण्याची शक्यता

Web News Wala

माइक्रोसॉफ्ट खरेदी करणार टिकटॉक चा व्यवसाय

Team webnewswala

1 April पासून वीजदर होणार कमी

Web News Wala

Leave a Reply