Team WebNewsWala
Other इतर शहर

सोमवारपासून मुंबई मेट्रो सुरु, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

राज्य सरकारने गुरुवारपासून मुंबई मेट्रो सुरु करण्यासाठी परवानगी दिली आहे. मुंबई लोकल मात्र अद्यापही बंद राहणार असून प्रतिक्षा करावी लागणार आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेला लॉकडाउन राज्य सरकार टप्प्याटप्प्याने शिथील करत आहे. १ ऑक्टोबरपासून अनलॉकच्या पाचव्या टप्प्याला सुरुवात झाली असून ठाकरे सरकारकडून काही निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. दरम्यान राज्य सरकारने गुरुवारपासून मुंबई मेट्रो सुरु करण्यासाठी परवानगी दिली आहे. मुंबई लोकल मात्र अद्यापही बंद राहणार असून प्रतिक्षा करावी लागणार आहे.

मेट्रोची तयारी अशी..

घाटकोपर – वर्सोवा या मार्गावर धावणाऱ्या मेट्रोच्या सुरक्षा तपासण्या आणि चाचण्यांची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. सोमवारी सकाळी ८.३० पासून मेट्रो प्रवाशांच्या सेवेत रुजू होईल.

मेट्रो १ च्या व्यवस्थापनाने दोन महिन्यांपूर्वीच उपाययोजना आखण्यास सुरूवात केली होती. अंतरनियम पाळणे, प्लास्टिक टोकनचा वापर कमी करण्यावर भर देण्यात येणार असून, दोन प्रवाशांमध्ये अंतर पाळण्यासाठी आसनव्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे घाटकोपर ते वर्सोवा या टप्प्यात एका वेळी एका मेट्रो गाडीतून केवळ ३०० जण प्रवास करू शकतील. करोनापूर्व काळात याच मेट्रोतून सुमारे १,३५० जण प्रवास करत होते.

प्रवासासाठी प्लास्टिक टोकन वापरण्याऐवजी मोबाईल अ‍ॅपद्वारे तिकीट काढण्यास प्रोत्साहन दिले जाईल. रिचार्ज कार्डचा वापरही वाढवला जाईल. हे पर्याय वापरता न येणाऱ्यांना छापील तिकीट मिळेल.

टाळेबंदीपूर्वी रोज सुमारे साडेचार लाख प्रवासी मेट्रो सुविधेचा लाभ घेत होते. गर्दीच्या वेळेस तीन मिनिटांत एक गाडी, तर एरवी पाच मिनिटांत एक गाडी याप्रमाणे दिवसाला ४०० हून अधिक फेऱ्या होत होत्या. सोमवारपासून किती मेट्रो फेऱ्या चालविण्यात येतील, याबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचे मेट्रो १ च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

राज्य सरकारकडून नवं परिपत्रक प्रसिद्ध

राज्य सरकारकडून नवं परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे. यामध्ये ग्रंथालयं सुरु करण्यासाठीही परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान राज्य सरकारकडून शाळा, महाविद्यालयं सुरु करण्यासाठी अद्यापही परवानगी देण्यात आलेली नाही, मात्र शिक्षकांना ५० टक्के उपस्थितीची मुभा देण्यात आली आहे.

परिपत्रकात देण्यात आलेल्या माहितीनुसार, शाळा, महाविद्यालयं तसंच शैक्षणिक आणि प्रशिक्षण संस्था ३१ ऑक्टोबरपर्यंत बंद राहणार आहेत. दरम्यान शाळांना ५० टक्के शिक्षक तसंच इतर कर्मचाऱ्यांना ऑनलाइन शिक्षण, टेली काऊन्सलिंग याशिवाय इतर कामांसाठी शाळेत बोलावण्याची परवानगी देण्यात आली आहे. शाळा शिक्षण विभागाकडून यासंबंधी नियमावली जाहीर केली जाणार आहे.

सर्व सरकारी आणि खासगी ग्रंथालयांना करोनासंबंधित नियमांचं पालन करुन काम सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. १५ ऑक्टोबरपासून ग्रंथालयं सुरु होणार आहेत. याशिवाय मेट्रोलाही टप्याटप्याने सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

याशिवाय आठवडी बाजार भरवण्यासही परवानगी देण्यात आली आहे. १५ ऑक्टोबरपासून कंटेनमेंट झोनच्या बाहेर आठवडी बाजार भरवला जाऊ शकतो असं राज्य सरकारने स्पष्ट केलं आहे. याशिवाय दुकानं दोन तास अतिरिक्त उघडी ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. यामुळे दुकानं सकाली ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत सुरु राहू शकतात. राज्य सरकारने परिपत्रकात मुंबई लोकल तसंच धार्मिकस्थळांचा उल्लेख केलेला नाही.

राज्य सरकारने याआधी जाहीर केलेली नियमावली –

– ५ ऑक्टोबरपासून ५० टक्के क्षमतेत उपहारगृहे, फूड कोर्ट आणि बार सुरु करण्यास परवानगी.
– राज्यांतर्गत रेल्वेसेवा (मुंबई-पुणे, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद, नागपूर, रत्नागिरी) सुरु करण्यासाठी राज्य सरकारने परवानगी.
– मुंबईच्या धर्तीवर पुणे शहरातील उपनगरीय रेल्वे सेवा सुरु .
– मुंबईतील डबेवाल्यांना क्यूआर कोडच्या माध्यमातून रेल्वेतून प्रवास करण्याची परवानगी.
– मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या हद्दीतील सर्व उद्योग, आस्थापना सुरु करण्यास मुभा.
-चित्रपटगृहं १५ ऑक्टोबरपासून सुरु कऱण्यासाठी केंद्राने परवानगी दिली आहे. राज्याने मात्र यासाठी नकार दिला आहे.
– व्यायामशाळा सुरु करण्यासाठी केंद्राने याआधीच परवानगी दिली आहे, राज्याने मात्र यासाठी अनुमती दिलेली नाही.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

लॉकडाऊन च्या काळात कास पठारावर दुर्मीळ फुलांचा बहर

Team webnewswala

मुंबई आजपासून अनलॉक जाणून घ्या नवीन बदल

Web News Wala

गंगेत सापडला Suckermouth catfish तज्ज्ञांकडून चिंता

Team webnewswala

Leave a Reply