ऑटो शहर

१ फेब्रुवारीपासून मुंबई मेट्रोच्या वेळेत बदल

१ फेब्रुवारीपासून मुंबई मेट्रोच्या वेळेत बदल होत आहे. नव्या वेळापत्रकानुसार सकाळी ६ वाजून ५० मिनिटांनी घाटकोपर स्थानकासाठी पहिली मेट्रो सुटेल.

१ फेब्रुवारीपासून मुंबई मेट्रोच्या वेळेत बदल

मुंबई : सर्वांसाठी सशर्त लोकल सेवा सुरू होत आहे. जे नागरिक लोकल आणि मेट्रो या दोन्हीतून प्रवास करुन घर वा कार्यालय (ऑफिस) गाठतात, त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी. १ फेब्रुवारीपासून मुंबई मेट्रोच्या वेळेत बदल होत आहे. नव्या वेळापत्रकानुसार दररोज सकाळी ६ वाजून ५० मिनिटांनी वर्सोवा येथून घाटकोपर स्थानकासाठी पहिली मेट्रो सुटेल. तसेच दररोज सकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी घाटकोपर येथून वर्सोवा स्थानकासाठी पहिली मेट्रो सुटणार आहे.

सध्या दररोज सकाळी ७ वाजून ५० मिनिटांनी वर्सोवा येथून घाटकोपर स्थानकासाठी पहिली मेट्रो सुटते. तसेच दररोज सकाळी ८ वाजून १५ मिनिटांनी घाटकोपर येथून वर्सोवा स्थानकासाठी पहिली मेट्रो निघते. वर्सोवा येथून घाटकोपर स्थानकासाठी शेवटची मेट्रो दररोज रात्री ९ वाजून ५० मिनिटांनी तसेच घाटकोपरहून वर्सोवा स्थानकासाठी शेवटची मेट्रो दररोज रात्री १० वाजून १५ मिनिटांनी सुटते. रात्रीच्या मेट्रोच्या व्यवस्थेत बदल केलेला नाही.

मेट्रो स्टेशनशी जोडणारे पादचारी पूल सर्वांसाठी खुले

अंधेरी आणि घाटकोपर या दोन स्टेशनांना अनुक्रमे अंधेरी आणि घाटकोपर या मेट्रो स्टेशनशी जोडणारे पादचारी पूल (Foot Over Bidge – FOB) तसेच मेट्रोच्या हद्दीतले प्रवेश आणि बाहेर पडण्यासाठीचे सर्व मार्ग सर्वांसाठी १ फेब्रुवारीपासून खुले असतील. मेट्रोच्या हद्दीतून रेल्वेच्या हद्दीत तसेच रेल्वेच्या हद्दीतून मेट्रोच्या हद्दीत प्रवेश करणाऱ्यांनी नियमानुसार योग्य ते तिकीट वा पास खरेदी करुन अथवा सोबत घेऊन प्रवास करावा; असे आवाहन मेट्रो आणि रेल्वेच्या प्रशासनाने केले आहे.

अंधेरी आणि घाटकोपर या मेट्रो स्टेशनवरुन थेट अंधेरी आणि घाटकोपर येथील वर्दळीच्या महत्त्वाच्या रस्त्यावर जाण्याची सोय आहे. याच पद्धतीने त्या रस्त्यांवरुन मेट्रोच्या हद्दीत प्रवेश करण्याचीही सोय उपलब्ध राहील. पण मेट्रोच्या हद्दीत प्रवेश केला तर योग्य रकमेच्या तिकिटासह प्रवास करावा, असे आवाहन मेट्रो प्रशासनाकडून करण्यात आले आहे. अंधेरीत मेट्रोच्या हद्दीतून बाहेर पडण्यासाठी आणखी एक मार्ग तयार करण्यात आला आहे. हा मार्ग १ फेब्रुवारीपासून सर्वांसाठी उपलब्ध असेल.

मेट्रो स्टेशनचा प्लॅटफॉर्म तिथे पहिली मेट्रो येण्याच्या १५ मिनिटे आधी खुला

प्रत्येक मेट्रो स्टेशनचा प्लॅटफॉर्म तिथे पहिली मेट्रो येण्याच्या १५ मिनिटे आधी खुला होईल आणि शेवटची मेट्रो तिथून निघून गेल्यानंतर एकही प्रवासी नसल्याची खात्री करुन घेऊन बंद केला जाईल. कोणालाही मेट्रोच्या प्लॅटफॉर्म परिसरात विनाकारण रेंगाळण्यास मनाई आहे.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

उंच इमारतीच्या कठड्यावर खतरनाक स्टंट, Video Viral

Team webnewswala

१ ऑक्टोबरपासून नवे बदल होणार गॅस सिलेंडरपासून आरोग्य विम्यापर्यंत

Team webnewswala

नागपुर मुंबई बुलेट ट्रेन साठी हवाई सर्वेक्षण सुरू

Web News Wala

Leave a Reply