Team WebNewsWala
शहर

मुंबई १५ जून पर्यंत लॉकडाऊनचे नियम जाहीर

विद्यार्थ्यांसाठी दोन डोसमधील कालावधी कमी करा, पालिकेचं केंद्राला पत्र

मुंबई १५ जून पर्यंत लॉकडाऊनचे नियम जाहीर 

Webnewswala Online Team – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याला संबोधित करताना १५ जून पर्यंत लॉकडाऊन वाढविणार असल्याचे घोषित केले आहे. तसेच स्थानिक पातळीवरील प्रशासनांना आपली नियमावली ठरविण्याचे अधिकार दिले आहे. रेड झोनमधून बाहेर आलेल्या मुंबई महापालिकेने मुंबई १५ जून पर्यंत लॉकडाऊनचे नियम जाहीर केले आहेत.

मुंबई महापालिकेचे आयुक्त आय एस चहल यांनी आज सायंकाळी प्रसिद्ध पत्रकाद्वारे हे नियम जाहीर केले

१) अत्यावश्यक दुकाने सकाळी ७.०० ते दुपारी २.०० पर्यंत सर्व दिवस उघडी राहतील.

२) आवश्यकतेतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी ७.०० ते दुपारी २.०० पर्यंत पुढील व्यवस्थेनुसार उघडी राहतील

पहिल्या आठवडयात रस्त्याच्या उजव्या बाजुकडील दुकाने सोमवार, बुधवार व शुक्रवार उघडी राहतील तर रस्त्याच्या डाव्या बाजुकडील दुकाने मंगळवार, गुरुवार उघडी राहतील.

त्या पुढील आडवडयात रस्त्याच्या डाव्या बाजूकडील दुकाने सोमवार, बुधवार व शुक्रवार उघडी राहतील व रस्त्याच्या उजवीकडील दुकाने मंगळवार, गुरुवार उघडी राहतील.

अशाच पध्दतीने पुढील आडवडयांत दुकाने उघडी राहतील. शनिवार व रविवारी आवश्यकतेतर दुकाने पूर्णत: बंद राहतील.

३) ई कॉमर्स अंतर्गत अत्यावश्यक वस्तु बरोबर आवश्यकतेतर वस्तुंचे वितरण करण्यास परवानगी असेल.

४) राज्य शासनाने आपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५ (२००५ या ५३ वा कायदा राज्यात लागू असलेल्या इतर कायद्यान्वये जारी केलेले ‘ब्रेक-द-चेन’ बाबतचे आदेश अस्तीत्वात असेपर्यंत हे आदेश लागू राहतील.

५) शासनाने वेळोवेळी जाहीर केल्याप्रमाणे सर्व व्यापारी आस्थापनांना सोशल डिस्टसिंग, मास्कचा वापर व इतर उपाययोजना अनिवार्य राहतील.

६) उक्त आदेशान्वये सर्व संबंधितांनी तत्काळ अंमलबजावणी करावी. सदरहू आदेशाची अंमलबजावणी करण्यास कोणत्याही व्यक्तीने टाळाटाळ केल्यास अथवा विशेष दर्शविल्यास संबंधितांचे विरुध्द यथास्थिती आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील कलम ५१ ते ६० व भारतीय दंड संहिता १८६० मधील कलम १८८ आणि इतर कायदेशीर तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल.

Web Title – मुंबई १५ जून पर्यंत लॉकडाऊनचे नियम जाहीर ( Mumbai lockdown rules announced till June 15 )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

 

Related posts

नंदनवन संस्थेची दिव्यांग विद्यार्थिनी सोनम पाटील हिला मिस व्हिलचेअर किताब

Web News Wala

‘इंदु की जवानी’ निर्माता रायन स्टीफन चे कोरोनाने निधन

Web News Wala

७००० रुपये प्रति लिटर गाढविणीच्या दुधाची देशातील पहिली डेअरी

Team webnewswala

Leave a Reply