Team WebNewsWala
शहर समाजकारण

Mumbai Central स्थानकाचे नाव नाना शंकरशेठ टर्मिनस होणार

Mumbai Central टर्मिनसचे नाव बदलून 'नाना शंकरशेठ टर्मिनस' असे करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना खासदार अरविंद सावंतयांनी दिली आहे

मुंबई : पश्चिम रेल्वे (Western Railway) वरील Mumbai Central टर्मिनस (Mumbai Central Terminus)चे नामांतरण करण्यात यावे अशी मागणी शिवसेनेकडून होत होती आता शिवसेनेच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून लवकरच रेल्वे स्थानकाचे नामांतर करण्यात येणार आहे. Mumbai Central टर्मिनसचे नाव बदलून ‘नाना शंकरशेठ टर्मिनस’ (Nana Shankarseth Terminus) असे करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना खासदार अरविंद सावंत (Shiv Sena MP Arvind Sawant) यांनी दिली आहे. केंद्र सरकारकडून या नामांतराची प्रक्रिया सुरू झाली आहे.

Mumbai Central टर्मिनसचं नाव बदलून ‘नाना शंकरशेठ’ टर्मिनस करण्याची मागणी 

मुंबई सेट्रल टर्मिनसचे नाव बदलण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात येत आहे. शिवसेनेच्या या मागणीला केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी पत्राद्वारे उत्तर देत नामांतराच्या संदर्भातील प्रक्रिया सुरू असल्याचं म्हटलं आहे. केंद्रीय गृहराज्य मंत्री नित्यानंद राय यांनी आपल्या पत्रात म्हटलं, “मुंबई सेंट्रल टर्मिनसचं नाव बदलून ‘नाना शंकरशेठ’ टर्मिनस करण्याची मागणी करण्यात आली आहे. या संबंधी योग्य ती प्रक्रिया सुरू आहे. सर्व संबंधित एजन्सीकडून अहवाल प्राप्त झाल्यावर योग्य तो कार्यवाही करण्यात येईल.”

मुंबई सेंट्रल स्थानकाचे नाव 'नाना शंकरशेठ टर्मिनस होणार

गेली सहा वर्ष यासंदर्भात मागणी

शिवसनेना खासदार अरविंद सावंत यांनी म्हटलं, “लोकसभेत गेली सहा वर्ष यासंदर्भात आम्ही ही मागणी करत होतो. अलिकडे गृहमंत्री अमित शहा यांच्याकडेही मी पत्रव्यवहार केला होता. महाविकास आघाडी सरकारने या संदर्भातील प्रस्ताव विधिमंडळात मंजूर केल्यानंतर आता केंद्र सरकारकडून केवळ प्राथमिक मान्यता मिळावी असं मी पत्रात म्हटलं होतं. यावर केंद्रीय गृहराज्य मंत्र्यांचं उत्तर आलं आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की नामकरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे.”

Mumbai Central टर्मिनसचे नाव बदलून 'नाना शंकरशेठ टर्मिनस' असे करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना खासदार अरविंद सावंतयांनी दिली आहे

नाना शंकरशेठ हे शिक्षणतज्ञ होते. शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे. भारतातील पहिली रेल्वे सुरू करण्यासाठी नाना शंकरशेठ यांनी महत्वाची कामगिरी केली होती. मुंबईच्या विकास कार्यातही त्यांनी मोठे योगदान दिले आहे.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

कोपरी पुल कामासाठी मध्य रेल्वेवर रात्रीचे विशेष ब्लॉक

Web News Wala

अमृता फडणवीसांवर रेणुका शहाणेंची खरमरीत टीका

Team webnewswala

गणेशोत्सवानन्तर नवरात्रीलाही कोरोनाचा फटका

Team webnewswala

Leave a Reply