ऑटो

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन L&T ला २,५०० कोटीचं कंत्राट

देशातील पहिला मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान होणार आहे.

मुंबई : मुंबई-अहमदाबादला जोडणाऱ्या देशातील पहिल्या हाय स्पीड रेल कॉरिडोर प्रकल्पातंर्गत लार्सन अ‍ॅण्ड टुब्रोला २५०० कोटी रुपयाचे मोठे कंत्राट मिळाले आहे. लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो पायाभूत सुविधा उभारणी क्षेत्रातील मोठी कंपनी आहे. त्यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. देशातील पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान होणार आहे.

नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (NHSRCL) हाय स्पीड रेल कॉरिडोर प्रकल्पाची अमलबजावणी करणार आहे. हाय स्पीड रेल कॉरिडोर प्रकल्प जपानी इ ५ शिंकानसेन टेक्नोलॉजीवर आधारीत आहे. बुलेट ट्रेन हा मोदी सरकारचा महत्वकांक्षी प्रकल्प आहे. ते जपानच्या सहकाऱ्याने हा प्रकल्प तडीस नेण्याचा प्रयत्न करत आहेत.

हाय स्पीड रेल कॉरिडोर प्रकल्प जपानी इ ५ शिंकानसेन टेक्नोलॉजीवर आधारीत

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे तत्कालिन पंतप्रधान शिंझो अबे यांच्या उपस्थितीत सप्टेंबर २०१७ मध्ये मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या पायाभरणीचा कार्यक्रम झाला होता. हा ५०८ किलोमीटरचा मार्ग आहे. या प्रकल्पाचे बांधकाम सुरु झाल्यानंतर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मिळून ९० हजार पेक्षा जास्त रोजगार उपलब्ध होऊ शकतात. प्रतितास ३०० किमी पेक्षा जास्त वेग गाठवण्याचा या बुलेट ट्रेन प्रकल्पाचा उद्देश आहे.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रन व्यतिरिक्त दिल्ली-अहमदाबाद, दिल्ली-अमृतसर, वाराणसी-हावडा, दिल्ली-वाराणासी, मुंबई-हैदराबाद, मुंबई-नागपूर, चेन्नई-मैसोर दरम्यान हायस्पीड रेल कॉरिडोरची व्यवहार्यता तपासण्याला मंजुरी देण्यात आली आहे.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

खासगी कंपन्या चालवणार देशात Private Trains

Team webnewswala

जगातील सर्वात मोठी विमानवाहू युध्दनौका INS विराट 100 कोटीस विकण्यास तयार

Team webnewswala

मारुती, महिंद्रानंतर Tata Motors ने दिला झटका

Web News Wala

Leave a Reply