Team WebNewsWala
तंत्रज्ञान

Multi Device Support एकावेळी 4 फोन्समध्ये वाप WhatsApp

Multi Device Support च्या माध्यमातून ही मागणी पूर्ण होत आहे. तसेच Disappearing Mode आणि View Once हे फीचर देखील WhatsApp मध्ये दिसणार आहेत.

Multi Device Support एकावेळी 4 फोन्समध्ये वाप WhatsApp

Webnewswala Online Team – जगभरात सर्वात जास्त वापरले जाणाऱ्या अ‍ॅप्सपैकी एक असलेले WhatsApp आपल्या युजर्ससाठी नेहमी नवीन-नवीन फीचर्स आणत असते. परंतू काही फिचर्स अद्यापही व्हाट्सअ‍ॅपवर उपलब्ध नाहीत. त्यामुळे युजर्सकडून त्याची वांरवार मागणी होत असते. यापैकीच एक फिचर म्हणजे एकच व्हाट्सअ‍ॅप नंबर अनेक फोन्समध्ये वापरता यावा अशी अनेकांची मागणी होती. युजर्सची ही गरज ओळखून व्हाट्सअ‍ॅप काम करत असून लवकरच Multi Device Support च्या माध्यमातून ही मागणी पूर्ण होत आहे. तसेच Disappearing Mode आणि View Once हे फीचर देखील WhatsApp मध्ये दिसणार आहेत. एकापेक्षा जास्त फोन्स वापरणाऱ्या लोकांसाठी हे फिचर वरदान ठरणार आहे.

व्हाट्सअ‍ॅपच्या या नव्या फीचर्सची माहिती WABetaInfo वेबसाइटच्या माध्यमातून समोर आली आहे. वेबसाइटने WhatsApp चे CEO Will Cathcart यांच्याशी संवाद साधला होता. त्यावेळी आगामी फीचर्सची माहिती समोर आली.

Multi Device Support, Disappearing Mode आणि View Once लवकरच रोलआउट

कंपनीच्या सीईओनी सांगितले कि, व्हाट्सअ‍ॅप Multi Device Support, Disappearing Mode आणि View Once हे फीचर लवकरच रोलआउट केले जातील. प्राप्त माहितीनुसार युजर त्यांचे व्हाट्सअ‍ॅप अकाउंट एकाचवेळी 4 फोन्समध्ये वापरू शकतील. यापूर्वी एका स्मार्टफोनमधील व्हाट्सअ‍ॅप नंबरने दुसऱ्या फोनमध्ये लॉगिन केल्यावर जुन्या फोनवरील अकॉउंट बंद होत असे.

तसेच डिसअपेरिंग फीचर अंतर्गत ठरविक वेळेत एखाद्या व्यक्तीला पाठवलेले मेसेजेस आपोआप गायब होतात. हे फीचर आता लवकरच व्हाट्सअ‍ॅप युजर्सना पण मिळणार आहे. तसेच व्हाट्सअ‍ॅप व्यू वन्स फीचर देखील लवकरच रोलआउट होणार आहे यात पाठवलेला फोटो किंवा व्हिडीओ मेसेज मिळवणारा व्यक्ती फक्त एकदाच बघू शकतो. त्यानंतर तो फोटो किंवा व्हिडीओ पुन्हा पाहता येत नाही. या फिचरविषयी अधिक माहिती समोर आली नाही.

Web Title – Multi Device Support एकावेळी 4 फोन्समध्ये वाप WhatsApp ( Multi Device Support Use WhatsApp in 4 phones at once )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

 

Related posts

Task Mate App टास्क पूर्ण करुन कमवा पैसे

Team webnewswala

लवकरच गुगलचे हे लोकप्रिय अ‍ॅप होणार बंद

Team webnewswala

शाओमी’च्या Mi Browser वर भारताची बंदी

Team webnewswala

Leave a Reply