Team WebNewsWala
अर्थकारण आंतरराष्ट्रीय पर्यावरण व्यापार

मुकेश अंबानी करणार बिल गेट्स यांच्या व्हेंचरमध्ये गुंतवणूक

बिल गेट्स यांच्या क्लिन एनर्जीच्या ब्रेकथ्रू एनर्जी व्हेंचर्समध्ये मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजनं ५० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. 

जगातिल दिग्गज उद्योजक आणि मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांच्या क्लिन एनर्जीच्या ब्रेकथ्रू एनर्जी व्हेंचर्समध्ये मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजनं ५० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.

यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीजचे चे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांचं नाव बिल गेट्स, जेफ बेझोस, मायकल ब्लूमबर्ग, जॅक मा, मासायोशी सोन यांसारख्या दिग्गज गुतवणुकदारांच्या यादीत आलं आहे.

या सर्व गुंतवणुकदारांनी बिल गेट्स यांच्या क्लिन एनर्जी या उपक्रमाच्या ब्रेकथ्रू एनर्जी व्हेंचर्समध्ये गुंतवणूक केली आहे. याप्रकारे या फंडमध्ये रिलायन्स ५.७५ टक्क्यांचं आपलं योगदान देणार आहे. पुढील ८ ते १० वर्षांमध्ये टप्प्याटप्प्यां रिलायन्स ही गुंतवणूक करणार आहे.

काय म्हटलंय रिलायन्सनं  ?

रिलायन्स इंडस्ट्रीजनं गुरूवारी बाजाराला याबाबत माहिती दिली. “कंपनीनं ब्रेकथ्रू एनर्जी सेकंड, एलपीमध्ये ५० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करण्यासाठी एक करार केला आहे. ही एक लिमिटेड पार्टनरशिप फर्म आहे. ज्याची स्थापना अमेरिकेच्या डेलवेअर स्टेटच्या कायद्यांतर्गत झाली आहे,” असं रिलायन्सकडून बाजाराला सांगण्यात आलं.

बिल गेट्स यांचा ग्रीन एनर्जी व्हेंचर महत्त्वपूर्ण उपक्रम असून ऊर्जा आणि कृषी तंत्रज्ञानाच्या विकासासाठी गुंतवणूक करून हवामान बदलावरील तोडगा शोधण्याचं काम केलं जातं. या फंडचा उद्देश कोणत्याही प्रकारचं उत्सर्जन न करणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणं हा आहे. “या सर्व प्रयत्नांना भारतालाही फायदा होणार असून संपूर्ण मानवजातीलाच याचा उपयोग होईल.

या गुंतवणुकीसाठी सध्या रिझर्व्ह बँकेकडून मंजुरी घ्यावी लागणार आहे, असंही रिलायन्सकडून सांगण्यात आलं.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

कारखान्याला ऊस न विकता हा कमावतोय लाखो रुपये

Web News Wala

कर्णधार सुनील छेत्री चा विक्रम लिओनेल मेस्सी ला टाकले मागे

Web News Wala

महाराष्ट्रात सुटी सिगारेट व बिडी विकायला बंदी

Team webnewswala

Leave a Reply