Team WebNewsWala
अर्थकारण आंतरराष्ट्रीय व्यापार

मुकेश अंबानी जगातील सर्वात श्रीमंत चौथी व्यक्ती

Reliance Jio ला आर्थिक वर्ष २०२०-२१ च्या दुसऱ्या तिमाहित २ हजार ८४४ कोटी रूपयांचा निव्वळ नफा झाला आहे. ३० सप्टेंबर रोजी संपलेल्या Reliance Jio Q2 कंपनीच्या नफ्यात तिप्पट वाढ झाल्याचं पाहायला मिळालं.

नवी दिल्ली – तब्बल 22 अब्ज डॉलर्सची संपत्ती रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी कोरोनाकाळात कमावल्यामुळे त्यांची संपत्ती आता 81 अब्ज डॉलर्सवर पोहचली आहे. त्यामुळे ते आता जगातील चौथे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहे.

यासंदर्भात ब्लूमबर्ग इंडिकेशनने दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी 22 अब्ज डॉलर्स नफा अंबानी यांनी कमावला आहे. त्यांनी संपत्तीमधील या वाढीमुळे फ्रान्सच्या बर्नार्ड अर्नाल्ट यांना मागे टाकून अंबानी जगातील सर्वात श्रीमंत चौथे व्यक्ती बनले आहेत.

नक्की वाचा >> 
भारत 2G मुक्त करण्यासाठी पावलं उचलण्याची वेळ मुकेश अंबानी 
जिओ ग्लासची एंट्री : रिलायन्सची थ्रीडी व्हर्च्युअल क्लासरूम  
व्हॉट्सअ‍ॅप मध्ये पाहता येणार शेअरचॅटचे व्हिडीओ

मुकेश अंबानी जगातील सर्वात श्रीमंत चौथी व्यक्ती

जगातील प्रमुख श्रीमंत व्यक्तींमध्ये अ‍ॅमेझॉनचे जेफ बेजोस प्रथम क्रमांकावर तर मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स दुसऱ्या आणि फेसबुकचे मार्क झुकेरबर्ग तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
  • जगातील श्रीमंताच्या यादीत अ‍ॅमेझॉनचे जेफ बेजोस हे अव्वस्थानी कायम आहेत. ब्लूमबर्ग इंडिकेशनने दिलेल्या माहितीनुसार, 187 अब्ज डॉलर एवढी त्यांची एकूण संपत्ती आहे. 72.1 अब्ज डॉलरची वाढ यावर्षी त्यांच्या संपत्तीत झाली आहे.
  • 121 अब्ज डॉलर मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स यांची एकूण संपत्ती आहे. गेट्स यांच्या संपत्तीत 7.51 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे.
  • फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांची एकूण संपत्ती 102 अब्ज डॉलर आहे. झुकेरबर्ग यांच्या संपत्तीत 23 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे.मार्क झुकेरबर्ग हे पहिल्यांदाच 100 अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सहभागी झाली आहेत. जगातील फक्त तीनच व्यक्तींची संपत्तीचा सहभाग यामध्ये आहे.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

रिलायन्स : कर्मचारी आणि कुटुंबीयांचे मोफत लसीकरण

Web News Wala

नोकरीची सुवर्णसंधी SBI मध्ये 4 हजार पदांसाठी भरती

Team webnewswala

नववर्षाच्या आतषबाजीने रस्त्यावर मरुन पडले शेकडो पक्षी

Web News Wala

Leave a Reply