Other शहर

एकनाथ खडसेंना वाढीव वीज बिलाचा ‘शॉक’

जळगावमधील मुक्ताईनगर येथील घरासाठी भाजप नेते एकनाथ खडसे यांना तब्बल १ लाख ४ हजार रुपयांचे बिल पाठवण्यात आले आहे.

जळगाव – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्य जनतेला पाठवण्यात आलेल्या वीज बिलाचा आकडा पाहून आश्चर्य व्यक्त होत असतानाच याचा फटका राजकीय नेत्यांनाही बसल्याचे चित्र आता दिसत आहे. जळगावमधील मुक्ताईनगर येथील घरासाठी भाजप नेते एकनाथ खडसे यांना तब्बल १ लाख ४ हजार रुपयांचे बिल पाठवण्यात आले आहे.

हे बिल एप्रिल ते जुलै अशा चार महिन्यांचे आहे. वापर कमी असूनही ऐवढे वीज बिल आल्याने एकनाथ खडसे यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. याप्रकरणी राज्य सरकारने चौकशी करावी तसेच बिलात सूट दिली गेली पाहिजे, अशी मागणीही एकनाथ खडसे यांनी केली आहे.

नक्की वाचा >>  प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे की, लॉकडाउनच्या या काळात येणारी वीज बिले अवास्तव असून ती न भरण्यासारखी आहेत. अशा पद्दतीने महावितरणने लोकांना वेठीस धरु नये. अवास्तव बिलांची राज्य सरकारने चौकशी केली पाहिजे. तसेच वाढीव बिलामध्ये सवलत दिली पाहिजे, अशी मागणी एकनाथ खडसे यांनी यावेळी केली आहे.

संपुर्ण सोसायटीचे बिल लावले काय ? हरभजन सिंग चा सवाल

राज्यातील करोनाबाधित पोलिस १० हजारांच्या घरात

अमृता फडणवीसांवर रेणुका शहाणेंची खरमरीत टीका

दरम्यान उच्च न्यायालयाने बुधवारी लॉकडाननंतर आलेल्या वाढीव वीज बिलात सवलत देण्याचे आदेश आपण देऊ शकत नसल्याचे स्पष्ट केले होते. तसेच याप्रकरणी तक्रार निवारण मंचाकडे ग्राहकांनी दाद मागण्याच्या आपल्या निर्देशांचा पुनरूच्चार केला.

त्याचबरोबर मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या खंडपीठाने वीज नियामक मंडळ तसेच वीजपुरवठादार कंपन्यांना ग्राहकांच्या तक्रारींवर विलंब न करता तातडीने निर्णय देण्याचे आदेशही दिले.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

सिगल पक्षांच्या संरक्षणासाठी Yeur Environmental Society ची जनजागृती मोहीम

Web News Wala

मुंबई, ठाणे क्षेत्रात ‘वन नेशन वन रेशनकार्ड’ योजना राबविणार

Team webnewswala

कशेळी ब्रिज जवळ कंटेनर थेट पुलावरून कोसळला खाडीमध्ये

Team webnewswala

Leave a Reply