Team WebNewsWala
शहर समाजकारण

भिवंडी लसीकरण केंद्राला खासदार कपिल पाटील यांची भेट

भिवंडी शहरातील भाग्यनगर - ताडाळी येथील कोरोना लसीकरण केंद्राला भाजपाचे खासदार कपिल पाटील यांनी भेट दिली. तसेच तेथील नागरिकांशी संवाद साधला.

भिवंडी लसीकरण केंद्राला खासदार कपिल पाटील यांची भेट

भिवंडी – भिवंडी शहरातील भाग्यनगर – ताडाळी येथील कोरोना लसीकरण केंद्राला भाजपाचे खासदार कपिल पाटील यांनी आज भेट दिली. तसेच तेथील डॉक्टर-कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देत नागरिकांशी संवाद साधला.

केंद्र सरकारकडून दुसऱ्या टप्प्यात ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षांवरील आजारी व्यक्तींसाठी लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीबरोबरत तेथील व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी भाजपाचे खासदार कपिल पाटील यांनी आज ताडाळी-भाग्यनगर येथील केंद्राला भेट दिली.

डॉक्टर व कर्मचाऱ्यांशी चर्चा

तसेच तेथील लसीकरण प्रक्रियेची माहिती घेतली. तसेच नागरिकांसाठी केलेल्या सुविधांबाबत सुचना केल्या. डॉक्टर व कर्मचाऱ्यांशी चर्चा करून कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सतर्कता व काळजी घेण्याचे आवाहन केले. कमीतकमी वेळेत व नागरिकांचे कोणतेही हाल न होता लसीकरणाच्या सुचना दिल्या. या वेळी तेथील काही नागरिकांशीही खासदार कपिल पाटील यांनी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून लसीकरणाला सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे. त्यानुसार देशभरात एकाचवेळी मोहीम सुरू आहे. लस संपूर्ण सुरक्षित असून, नागरिकांनीही मोठ्या संख्येने येऊन लस घ्यावी, असे आवाहन खासदार कपिल पाटील यांनी केले.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.comआमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

आधार क्रमांक किती वेळा वापरले आहे तपासा मोबाईल वरून

Web News Wala

Big Boss च्या माजी स्पर्धक स्वामी ओम यांचं निधन

Web News Wala

सागरी किनारा मार्गासाठी प्रवाळ स्थानांतर काम सुरू

Team webnewswala

Leave a Reply