Team WebNewsWala
Other शहर शिक्षण

अकरावीची प्रवेश प्रक्रिया मार्गी लावण्याच्या हालचाली

मराठा आरक्षण कायद्याला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिल्यामुळे मध्येच थांबविलेली अकरावीची प्रवेश प्रक्रिया पुन्हा सुरु करण्याबाबत शासनस्तरावर हालचाली सुरु आहेत.

मराठा आरक्षण कायद्याला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिल्यामुळे मध्येच थांबविलेली अकरावीची प्रवेश प्रक्रिया पुन्हा सुरु करण्याबाबत शासनस्तरावर हालचाली सुरु आहेत. शालेय शिक्षण विभागाकडून त्याबाबत प्रयत्न सुरु आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायद्याला स्थगिती दिल्यामुळे अकरावीची प्रवेश प्रक्रिया थांबविण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला.

ऑनलाईन पद्धतीने एकच प्रवेश फेरी पूर्ण

अद्याप प्रवेश प्रक्रिया ठप्प असल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये चिंता परसली आहे. संपूर्ण राज्यात ऑनलाईन पद्धतीने एकच प्रवेश फेरी पूर्ण झाली आहे. अजून तीन फेऱ्या बाकी आहेत. आवश्यकता वाटल्यास विशेष प्रवेश फेरी घेण्याचेही प्रस्तावित होते. प्रवेश प्रक्रिया कधी सुरु होते, याकडे  विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. या संदर्भात शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षां गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता, थांबलेले अकरावीचे प्रवेश पुन्हा सुरु करण्याचे प्रयत्न सुरु आहेत, याबाबत मुख्यमत्र्यांच्या स्तरावर लवकरच बैठक होईल, असे त्यांनी सांगितले.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

भिवंडी पालिकेचा अजब कारभार कोट्यवधींच्या घंटागाड्या धुळीत

Web News Wala

मोदी सरकारचा मोठा निर्णय खासदारांच्या वेतनामध्ये 30% कपात

Team webnewswala

शिवसेनेच्यावतीने कोरोना प्रतिबंध साहित्याचे वाटप

Team webnewswala

Leave a Reply