Team WebNewsWala
राजकारण राष्ट्रीय

मोदीजी दाढी करा चहावाल्याने पंतप्रधानांना पाठवली मनीऑर्डर

कोरोनामुळे दोन वेळा लॉकडाऊन करण्याची वेळ आली. यात अनेकांचे व्यवसाय बुडाले. त्यामुळे एका चहावाल्याने थेट पंतप्रधानांना शंभर रुपयांची मनीऑर्डर पाठवली

मोदीजी दाढी करा चहावाल्याने पंतप्रधानांना पाठवली मनीऑर्डर

Webnewswala Online Team – गेल्या दीड वर्षांत कोरोनामुळे दोन वेळा लॉकडाऊन करण्याची वेळ आली. यात अनेकांचे व्यवसाय रोजगार बुडाले. त्यामुळे नाराज झालेल्या बारामतीतल्या एका चहावाल्याने थेट पंतप्रधानांना शंभर रुपयांची मनीऑर्डर पाठवत आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले.

अनिल मोरे असं या चहावाल्याचे नाव आहे. शहरातील इंदापूर रस्त्यावर एका खासगी रुग्णालयासमोर मोरे चहाची टपरी चालवतात. गेल्या दीड वर्षात लॉक डाऊन झाल्याने चरितार्थ चालवणे अवघड झाले आहे. त्यामुळे नाराज होऊन त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच रजिस्टर पत्र पाठवून आपल्या मागण्या मांडल्या आहेत. याबाबत माहिती देताना मोरे म्हणाले, पंतप्रधान मोदी दाढी वाढवून फिरत आहेत. जर त्यांना काहीतरी वाढवायचे असेल तर लोकांसाठी रोजगार वाढवावा. लोकांसाठी आरोग्य सुविधासह लसीकरण केंद्र वाढवावे. लोकांची समस्या सुटतील याची काळजी घ्यावी.

मोदी यांचे पद देशाचे सर्वोच्च पद आहे. माझ्या कमाईतून पंतप्रधान मोदी साहेबांना दाढी करण्यासाठी मी 100 रुपये पाठवत आहे. पंतप्रधान हे देशाचे सर्वोच्च नेते आहेत ते आमचा त्यांच्याबद्दल आदर आहे, त्यांना त्रास देण्याचा आमचा हेतू नाही. परंतु कोरोना साथीच्या आजारात ज्या प्रकारे लोकांच्या समस्या वाढत आहेत. लोकांसाठी आरोग्यासह रोजगार वाढवावा, या मागण्यांकडे पंतप्रधानांचे लक्ष वेधण्यासाठी मार्ग स्वीकारला असल्याचे मोरे यांनी सांगितले. त्यांनी मनीऑर्डर सोबत एक पत्र पाठवून कोरोना कालावधीत कालावधीत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटूंबाला पाच लाख रुपये देण्याची मागणी मोरे यांनी केली आहे, याशिवाय पुढील लॉकडाउन लागू केल्यास एका कुटुंबासाठी 30 हजार रुपये द्या, अशी देखील मागणी मोरे यांनी केली आहे.

Web Title – मोदीजी दाढी करा चहावाल्याने पंतप्रधानांना पाठवली मनीऑर्डर ( Modiji shaves, tea vendor sends money order to PM )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

सोशल मीडिया वापरासाठी, केंद्र सरकारची नियमावली जाहीर

Web News Wala

अर्थव्यवस्थेला मोठा फटका, GDP 7.3 टक्क्यांनी घसरला

Web News Wala

Zerodha चे कामत बंधू घेणार Infosys CEO पेक्षाही अधिक वेतन

Web News Wala

1 comment

मोदीजी &#23... June 9, 2021 at 8:13 pm

[…] कोरोनामुळे दोन वेळा लॉकडाऊन करण्याची वेळ आली. यात अनेकांचे व्यवसाय बुडाले. त्यामुळे एका चहावाल्याने थेट पंतप्रधानांना शंभर रुपयांची मनीऑर्डर पाठवली  […]

Reply

Leave a Reply