Team WebNewsWala
राजकारण शहर

मेट्रो कारशेड नंतर वाढवण बंदरावरुन मोदी-ठाकरे सरकारमध्ये ‘सामना’ ?

मेट्रो ३ च्या कारशेड साठी आता बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सच्या जागेची चाचपणी होत असल्याची माहिती समोर आली होती. आरेमधून कारशेड कांजूरमार्गला गेल्यानंतर हे प्रकरण न्यायालयात

पालघर : मेट्रो ३ च्या कारशेड साठी आता बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सच्या जागेची चाचपणी होत असल्याची माहिती समोर आली होती. आरेमधून कारशेडची जागा कांजूरमार्गला गेल्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेलं होतं. मेट्रो कारशेडबाबत कांजूरमार्ग येथील जागेच्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. कांजूरमार्ग येथे कारशेड उभारण्यास न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर पुढे न्यायालयातील सुनावणी दीर्घकाळ चालण्याची शक्यता आहे.

त्यामुळे मेट्रोच्या कामावर परिणाम होऊ नये म्हणून मेट्रो ३ चे कारशेड बांद्रा कुर्ला संकुलातील बुलेट ट्रेनसाठीच्या प्रस्तावित जागेवर उभारता येते का ? या पर्यायाची चाचपणी करण्यात येत आहे. यावरून विरोधक टीका करत असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी वाढवण बंदर आणि बुलेट ट्रेनला विरोध करणाऱ्या आंदोलकांच्या समितची भेट घेतली. तसंच स्थानिकांचा विरोध असल्यास या प्रकल्पांना आपलाही विरोध असेल असंही त्यांनी स्पष्ट केलं. हे केंद्र सरकारचे महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्यानं आता पुन्हा एकदा राज्य सरकार आणि केंद्र सरकार आमने-सामने असल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

केंद्र सरकार राज्य सरकार आमने-सामने येण्याची शक्यता

“राज्य सरकारनं गुरूवारी मेट्रो कारशेडच्या उभारणीसाठी बीकेसी येथील बुलेट ट्रेनच्या प्रकल्पाची जागेची पाहणी करण्याचे आदेश दिले आहे. बुलेट ट्रेनला महाराष्ट्रातील भूसंपादन केलेल्या रहिवाशांकडून विरोध होत आहे. कांजूरमार्गातील मेट्रोकारशेडच्या प्रस्तावित जागेला न्यायालयानं स्थगिती दिली आहे. त्यामुळे हे प्रकरण किती वेळ चालेल सांगता येणार नाही. परंतु नुकसान होऊ नये यासाठी हा पर्याय समोर आला आहे,” असं मत नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं. पालघर जिल्ह्यात होऊ घातलेल्या वाढवण बंदरासंदर्भात स्थानिक मच्छिमार संघटना व वाढवण बंदर विरोधी संघर्ष कमिटी यांच्या प्रतिनिधींसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत वाढवण बंदरामुळे स्थानिकांना सामोऱ्या जावं लागतं असलेल्या समस्यांचा आढावा घेतला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र सरकार नेहमीच मच्छिमार बांधवांसोबत असल्याचं सांगत मच्छिमार बांधवांना योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचंही सांगितल्याचं ते म्हणाले.

स्थानिकांकडून विरोध

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पापैकी एक असलेल्या प्रस्तावित वाढवण बंदर विरोधी किनारपट्टी बंदला १६ डिसेंबर रोजी पालघर जिल्ह्यातील किनारपट्टी भागांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मच्छीमार वस्त्या असलेल्या जिल्ह्यातील झाई ते दातीवरेपर्यंतचा परिसर १०० टक्के बंद होता. पालघर जिल्ह्यात वाढवण येथे बंदर उभारल्यास येथील मच्छीमार, स्थानिक भूमिपुत्र, शेतकरी, आदिवासी, बागायदार देशोधडीला लागेल अशी भीती जिल्ह्यातील किनारपट्टी भागात व्यक्त करण्यात येते. या भावना सरकापर्यंत पोहोचवण्यासाठी पालघर जिल्हा व मुंबई जिल्ह्यातील सर्व मच्छीमारी गावाने मंगळवारी हा कडकडीत बंद पाळला.

बंदमध्ये मच्छीमार गावांनी सर्व प्रकारची उलाढाल बंद ठेवली होती तर काही ठिकाणी बंदराला विरोध दर्शवण्यासाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. काही गावांमध्ये मानवी साखळी उभी करून विरोध दर्शविला. काहींनी मुंडन करून या प्रकल्पाला आपला विरोध असल्याचे दाखवून दिले. मच्छीमार गावांतील बहुतांश आस्थापने बंद ठेवून बंदराला प्रखर विरोध दर्शविला गेला.

जिल्ह्यातील आमदारही या बंदमध्ये सहभागी

पालघर तालुक्यात दातिवरे, एडवण, केळवा, माहीम, सातपाटी, दांडी, उच्छेली, नवापूर,मुरबे आदी गावांनी कडकडीत बंद पाळला. मच्छीमार महिलाही मोठय़ा संख्येने रस्त्यावर उतरत बंदराला विरोध दर्शवीत असल्याचे पहावयास मिळाले. या गावांमधील सुमारे साडेचारशे ते पाचशे मच्छीमारी नौका मासेमारीला न जाता बंदरात नांगरून ठेवण्यात आल्या होत्या. जिल्ह्यातील आमदारही या बंदमध्ये सहभागी झाले होते. नागरिकांच्या भावना सरकापर्यंत पोचविण्यासाठी आमदारांनी वाढवण बंदर रद्द कराच्या घोषणाबाजी करत विधान भवनासमोर निदर्शने केली.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

धक्कादायक सलमानला मारण्यासाठी शार्पशूटर मुंबईत

Team webnewswala

धोपेश्वर सचिव मनोहर भगवान नवरे यांचा अजब कारभार माहिती अधिकार बाबत अज्ञान

Team webnewswala

पावसाने ‘टायगर 3’ चा सेट उद्ध्वस्त, कोट्यवधींचा फटका

Web News Wala

Leave a Reply