Team WebNewsWala
तंत्रज्ञान

1 जानेवारी पासुन बदलणार मोबाईल डायल करण्याचे नियम

भारतीय दूरसंचार नियामक मंडळाचा अर्थात 'ट्राय'चा (Telecom Regulatory Authority of India - TRAI) नवा आदेश 1 जानेवारी २०२१ पासून लागू होणार आहे.

नवी दिल्ली : भारतीय दूरसंचार नियामक मंडळाचा अर्थात ‘ट्राय’चा (Telecom Regulatory Authority of India – TRAI) नवा आदेश 1 जानेवारी २०२१ पासून लागू होणार आहे. या आदेशामुळे लँडलाइनवरुन मोबाइलवर कॉल करणाऱ्यांना एक बदल लक्षात ठेवून अंमलात आणावा लागेल. ‘ट्राय’च्या आदेशानुसार लँडलाइनवरुन मोबाइलवर कॉल करण्यासाठी मोबाइल नंबरच्या आधी शून्य हा क्रमांक डायल करावा लागेल.

1 जानेवारी पासुन नव्या फोन नंबरचे पर्याय उपलब्ध होणार

ताज्या आदेशामुळे  दूरसंचार सेवा देणाऱ्या कंपन्यांना मोठ्या संख्येने नव्या फोन नंबरचे पर्याय उपलब्ध होणार आहेत. याआधी लँडलाइन नंबरच्या आधी २ हा क्रमांक डायल करण्याचा आदेश लागू झाला होता. या आदेशामुळे मोठ्या संख्येने लँडलाइनसाठी नव्या फोन नंबरचे पर्याय उपलब्ध झाले होते.

लागोपाठ दोन शून्य असलेला एकही एसटीडी कोड भारतात नाही. तसेच कोणत्याही टोल फ्री क्रमांकाची तसेच कॉल सेंटरशी संपर्क साधण्याच्या क्रमांकाची सुरुवात शून्य या आकड्याने होत नाही. याच कारणामुळे अस्तित्वात असलेल्या सर्व दहा आकड्यांच्या मोबाइल नंबरच्या आधी शून्य हा क्रमांक डायल करुन पुढे मोबाइल क्रमांक डायल केला तर गोंधळ उडणार नाही आणि योग्य ठिकाणी संपर्क होऊ शकेल. ‘ट्राय’ने याच कारणामुळे लँडलाइनवरुन मोबाइलवर कॉल करण्यासाठी मोबाइल नंबरच्या आधी शून्य हा क्रमांक डायल करण्याचे बंधन घातले आहे.

मोबाइल नंबरच्या आधी शून्य हा क्रमांक डायल करण्याचे बंधन

जर अ नावाच्या व्यक्तीचा मोबाइल क्रमांक १२३४५६७८९९ असा असेल तर १ जानेवारी २०२१ पासून मोबाइलवरुन मोबाइलवर संपर्क करताना अ ला कॉल करण्यासाठी १२३४५६७८९९ डायल करावा लागेल. ही व्यवस्था सध्या लागू असल्यामुळे मोबाइलवरुन मोबाइलवर संपर्क साधणाऱ्यांना कोणताही फरक पडणार नाही. मात्र ‘ट्राय’च्या आदेशामुळे १ जानेवारी २०२१ पासून लँडलाइनवरुन अ व्यक्तीच्या मोबाइलवर कॉल करण्यासाठी ०१२३४५६७८९९ असा क्रमांक डायल करावा लागेल.

लक्षात ठेवा मोबाइल नंबरच्या आधी शून्य हा क्रमांक डायल करण्याचे बंधन १ जानेवारी २०२१ पासून लागू होणार आहे. जोपर्यंत हे बंधन लागू नाही तोपर्यंत लँडलाइनवरुन अ व्यक्तीच्या मोबाइलवर कॉल करण्यासाठी १२३४५६७८९९ असा क्रमांक डायल करावा. पण १ जानेवारी २०२१ पासून ‘ट्राय’च्या आदेशानुसार लँडलाइनवरुन अ व्यक्तीच्या मोबाइलवर कॉल करण्यासाठी ०१२३४५६७८९९ असा क्रमांक डायल करावा.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

Door Step Banking आता घरपोच मिळणार बँकेच्या सेवा

Team webnewswala

OTT चा चित्रपटगृह मालकांना आणखी एक मोठा धक्का

Team webnewswala

Social Media नंतर OTT साठी 15 दिवसांची ‘डेडलाइन’

Web News Wala

Leave a Reply