Team WebNewsWala
पर्यावरण शहर समाजकारण

पुण्यातल्या प्रदूषणावर रामबाण मनसे उपाय

मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पांना, आणखी एक पर्याय बाणेर येथील मनसे च्या अमित राऊत या युवा कार्यकर्त्यांने प्रकल्प प्रतिकृतीतून सादर केला आहे.

पुण्यातल्या प्रदूषणावर रामबाण मनसे उपाय

पुणे – मैलापाणी शुद्धीकरणासाठी नियोजित असलेले जायका सारखे मोठे प्रकल्प तसेच सध्या कार्यरत असलेल्या मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पांना, आणखी एक पर्याय बाणेर येथील मनसे च्या अमित राऊत या युवा कार्यकर्त्यांने प्रकल्प प्रतिकृतीतून सादर केला आहे.

‘मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प ‘ व त्यातून बाहेर पडलेल्या पाण्याचा वापर आपण कशारीतीने करू शकतो. याचा आढवाच या प्रकल्प प्रतिकृतीत देखाव्याच्या स्वरूपात दाखविण्यात आला आहे.

नद्या नाल्यांच्या स्वच्छतेसोबत पालिकेची आर्थिक कमाईसुद्धा

महापालिकेकडून पुरविण्यात येणारे शुद्ध पाणी वापरून झाल्यावर ते सरळ नदी मध्ये न सोडता त्यावर प्रक्रिया करून सोडल्यास, नद्या, नाले स्वछ राहू शकतात. व पालिकेला आर्थिक उत्पन्न मिळू शकते. तसेच नदीचे प्रदूषण न होता, मैल्यातून मिथेन, खत, गॅस निर्मिती होऊ शकते निर्मिती कशा प्रकारे होऊ शकते याची प्रतिकृती चल दखाव्यातून तयार करून, त्याद्वारे उत्तम असे सादरीकरण राऊत यांनी केले आहे. मनसे ‘ब्लू प्रिंट’ला साजेसा असा हा प्रकल्प सोसायटी स्तरापासून, झोपडपट्टी स्तरावर, मोठमोठ्या टाऊन शिपमध्ये तथा शहर पातळीवरही अंमलात येऊ शकतो.

लवकरच जाणार प्रस्ताव आयुक्तांकडे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ‘ब्लू प्रिंट’ला अनुसरून तयार केलेल्या या प्रकल्पाचे सादरीकरण शनिवारी पुण्यात पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या समोर अमित राऊत यांनी केले. तेव्हा हे सादरीकरण महानगरपालिका आयुक्तांनाही दाखवावे आशा सूचना ठाकरे यांनी दिल्या. यावेळी पक्षाचे शहराध्यक्ष वसंत मोरे यांच्यासह बाबू वागस्कर, किशोर शिंदे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.comआमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

हिंदी बोलताच, A R Rehman ने उडवली अँकरची खिल्ली

Web News Wala

कोल्हापुरी चप्पल आता अ‍ॅमेझॉनवर उपलब्ध

Team webnewswala

मीरा-भाईंदर महानगरपालिकेत ऑनलाइन माहिती अधिकार प्रक्रिया सुरू

Team webnewswala

Leave a Reply