Team WebNewsWala
पर्यावरण शहर

पुणे मेट्रो ला ‘मनसे’ विरोध

पुणे मेट्रो चे काम महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन करत आहे. या प्रकल्पासाठी महा मेट्रोने मुळा नदीच्या पात्रात भराव टाकण्यास सुरुवात केलीे.

पुणे: मुंबईत एका मेट्रो मार्गाच्या कारशेडवरुन राजकारण झाले. राज्यात आणि मुंबई मनपात सत्ताधारी असलेल्या शिवसेनेला अद्याप हा प्रश्न सोडवता आला नाही. प्रकल्पाचे काम रेंगाळले आणि खर्च वाढला. आता पुण्यात मेट्रोच्या प्रश्नावरुन राजकारण सुरू झाले आहे. (MNS opposed Pune Metro)

या भरावामुळे मुसळधार पाऊस झाल्यास पुण्यातील पेठांचा परिसर पाण्याखाली जाईल, अशी चिंता व्यक्त करत मनसेने मेट्रोला विरोध सुरू केला आहे.

मेट्रोसाठी मुळा नदीच्या पात्रात भराव टाकण्यास मनसेचा विरोध

डेक्कन जिमखाना (deccan gymkhana) ते पुणे मनपा (Pune Municipal Corporation) या परिसरात मेट्रो एका पुलावरुन जाणार आहे. या पुलासाठी मुळा नदीच्या पात्रात महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन (महा मेट्रो) भराव टाकत आहे. भराव टाकण्याच्या कामाचा निर्णय होताच मनसेने मेट्रोला विरोध सुरू केला आहे.

पुणे मेट्रोचे मार्ग निश्चित करताना नदीच्या पर्यावरणाला अडथळा होणार नाही, नदीत भराव टाकला जाणार नाही, असे महा मेट्रोने सांगितले होते. प्रकल्पाचे सादरीकरण करताना भराव टाकणार नसल्याच्या मुद्यावर महा मेट्रोचे अधिकारी ठाम होते. प्रत्यक्षात डेक्कन ते पुणे मनपा या भागात नदीपात्रात प्रचंड राडारोडा टाकला जात आहे. मोठ्या प्रमाणावर भराव टाकण्याचे काम सुरू आहे.

नदीपात्रातील भरावामुळे पुराचा धोका, मनसेने व्यक्त केली चिंता

नदीपात्रात भराव टाकून डेक्कन ते मनपा इमारत या दरम्यानचा नदीचा प्रवाह भविष्यात वळवला जाण्याची शक्यता आहे. सध्या ज्या पद्धतीने भराव टाकला जात आहे ते बघता पावसाळ्यात नदीचे पाणी वाढल्यास किंवा नदीपात्रात धरणातून पाणी सोडल्यास नदी काठालगतच्या पेठांमध्ये मोठ्या प्रमाणात पूर येण्याची शक्यता आहे.

पुणे मेट्रोच्या नावाखाली भराव टाकत असल्यामुळे नदीच्या पर्यावरणाला धोका निर्माण

पुणे मेट्रोच्या नावाखाली भराव टाकत असल्यामुळे नदीच्या पर्यावरणाला धोका निर्माण होत आहे. यातून पुण्याला असलेला पुराचा धोका आणखी वाढेल, अशी भीती मनसेने व्यक्त केली आहे. पानशेतचे धरण फुटून आलेल्या पुरापेक्षा मोठा पूर मेट्रोसाठीच्या भरावामुळे येऊ शकतो, अशी चिंता मनसेने व्यक्त केली. काही तजंज्ञांशी केलेल्या चर्चेनंतर भरावाबाबत चिंता व्यक्त करत असल्याचे मनसेने जाहीर केले. भराव प्रकरणी मनसेने पुण्याचे जिल्हाधिकारी आणि पुणे मनपाचे आयुक्त यांना निवेदन दिले आहे. भरावाचे काम थांबवा, अशी मागणी मनसेने केली आहे.

पुणे मेट्रोला नदीपात्रातील भराव काढून टाकण्याचे आदेश

किमान ८ ते १० वेळा जलसंपदा विभागाने पुणे मेट्रोला नदीपात्रातील भराव काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. हरित लवादानेही पुणे मेट्रोला नदीपात्रातील भराव काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. सरकारी यंत्रणेकडून वारंवार आदेश दिले जात असूनही भराव टाकण्याचे काम सुरू आहे. हे काम थांबवून सर्व भराव काढून टाकावा आणि तोपर्यंत मेट्रोचे पुढील कोणतेही काम करू नये, अशी मागणी मनसेने केली आहे.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

भिवंडी अतिक्रमण विभागाची कारवाई, भाजपाचे कार्यालय जमीनदोस्त

Web News Wala

जितेंद्र शिर्के भारतीय मराठा कल्याण संघाच्या जिल्हा संपर्कप्रमुख पदी

Team webnewswala

पालघर-सफाळे पर्यायी रस्त्यांची दुरवस्था

Team webnewswala

Leave a Reply