Team WebNewsWala
Other राजकारण शहर समाजकारण

पोलिसांच्या नोटीसीनंतरही मनसे नेत्यांनी केला रेल्वे प्रवास.

नोटीस झुगारून गनिमी कावा करत सकाळीच मनसे नेत्यांनी केला रेल्वे प्रवास केला. रेल्वे प्रवासाचा त्याचा विडिओ त्यांनी प्रसारित केला आहे.

मुंबईची लाईफलाईन असलेली मुंबई लोकल सुरू करावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज ‘सविनय कायदेभंग’ आंदोलनाचा इशारा दिला होता. हे आंदोलन होऊ नये यासाठी रेल्वे पोलिसांनी मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांना नोटिस बजावली होती. मात्र ही नोटीस झुगारून संदीप देशपांडे, संतोष धुरी, गजानन काळे यांनी गनिमी कावा करत सकाळीच मनसे नेत्यांनी केला रेल्वे प्रवास केला. रेल्वे प्रवासाचा त्याचा विडिओ त्यांनी प्रसारित केला आहे.

रेल्वे प्रवासाचा विडिओ
रेल्वेने प्रवास केल्यास कारवाईचा इशारा

मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांना काल मुंबई रेल्वे पोलिसांनी ही नोटीस पाठवली आहे. जर नोटीसी विरोधात रेल्वेने प्रवास केल्यास कायदेशीर कारवाई करू असा इशारा रेल्वे पोलिसांनी मनसेला दिला होता. मात्र आंदोलनावर ठाम असणाऱ्या देशपांडे यांनी आज गनिमी कावा करत रेल्वे प्रवास केला आहे.

 देशपांडे आंदोलनावर ठाम

नोटीस आली तरी आम्ही आंदोलनावर ठाम होतो. आम्ही अनेकवेळा सर्वसामान्यांसाठी रेल्वे प्रवास चालू करावा यासाठी राज्य सरकारकडे विनंती केली होती. चाकरमान्यांचे भरपूर हाल होत आहेत. सरकारचे डोळे उघडण्यासाठी आम्ही रेल्वे प्रवास करत सविनय कायदेभंग करत आहोत असे देशपांडे यांनी सांगितले.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

टाळेबंदीमुळे चित्रपट उद्योगांचे ९००० कोटींचे नुकसान

Team webnewswala

अभिनेता भूषण कडू च्या पत्नीचे कोरोनामुळे निधन

Web News Wala

अत्रे नाट्यगृह वाहतुक लिफ्ट चे काम त्वरित करा – नीलम गोऱ्हे

Team webnewswala

Leave a Reply