Team WebNewsWala
क्राईम राजकारण

सचिन वाझे प्रकरणात मनसे ची उडी

अंबानींच्या घरावरील हेलिपॅडला परवानगी मिळण्यासाठी सचिन वाझे ने सुपारी घेऊन रचलेला हा कट आहे, असा आरोप मनसे चे अविनाश जाधव यांनी वसईत केला.

सचिन वाझे प्रकरणात मनसे ची उडी

मुंबई – देशातील मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ प्रकरणात आता मनसेने उडी घेतली आहे. अंबानींच्या घरावरील हेलिपॅडला परवानगी मिळण्यासाठी एका बड्या मंत्र्याने सुपारी घेऊन रचलेला हा कट आहे, असा खळबळजनक आरोप मनसे चे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी वसईत केला.

अंबानी यांच्या हेलिपॅडला परवानगी मिळावी म्हणून रचलेला कट

मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके असलेली गाडी ठेवली, ही जीवाला धोका म्हणून की अंबानी यांच्या घरावर हेलिपॅडला परवानगी मिळावी म्हणून, याचा सखोल तपास होणे अत्यंत आवश्यक आहे. या सर्व प्रकरणात खूप मोठ्या मंत्र्याचा हात आहे. हा हेलिपॅडला परवानगी मिळवण्यासाठी सुपारी घेऊन रचलेला कट आहे, असा थेट आरोपच अविनाश जाधव यांनी केला.

गाडीत पैसे मोजण्याचं मशीन सापडणं हे गंभीर

निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या गाडीत पैसे मोजण्याचं मशीन सापडणं, हे फार मोठं गंभीर प्रकरण असल्याचंही अविनाश जाधव म्हणाले. हे सर्व प्रकरण पोलिसांच्या अंतर्गत वादातून बाहेर आलं आहे. सध्या या प्रकरणाचा एनआयए योग्य दिशेनं तपास करत आहे. अवघ्या दोन-तीन दिवसांत मोठी पत्रकार परिषद होणार असून यात राज्याच्या राजकारणातील मोठा स्फोट होणार असल्याचा दावाही अविनाश जाधव यांनी केला आहे.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

उद्धव ठाकरे यांची संजय राऊत यांनी घेतलेली अनलॉक मुलाखत

Team webnewswala

लोकल प्रवासासाठी खोटे QR Code बनवून देणारा अटकेत

Team webnewswala

भारतीय वृत्तवाहिन्यांवरील बंदी नेपाळने हटवली

Team webnewswala

Leave a Reply