Other तंत्रज्ञान राष्ट्रीय

चंद्रावर ‘प्रज्ञान रोव्हर’ अजून सुस्थितीत? फोटोंवरुन समोर आली नवीन माहिती

चांद्रयान-२ मोहिमेअंतर्गत ‘प्रज्ञान रोव्हर ला घेऊन रवाना झालेल्या ‘विक्रम लँडर’चा सॉफ्ट लँडिंगचा प्रयत्न अयशस्वी झाला १० महिन्यांनंतर नवीन माहिती समोर आली.
चंद्रावरील सॉफ्ट लँडिंगचा प्रयत्न अयशस्वी झाल्याच्या जवळपास १० महिन्यांनंतर समोर आली नवीन माहिती… चांद्रयान-२ मोहिमेअंतर्गत ‘प्रज्ञान रोव्हर’ला घेऊन रवाना झालेल्या ‘विक्रम लँडर’चा चंद्रावरील सॉफ्ट लँडिंगचा प्रयत्न अयशस्वी झाला होता. जवळपास १० महिन्यांनंतर आता त्याबाबत एक नवीन माहिती समोर आली आहे.

गेल्या वर्षी ‘नासा’च्या फोटोंचा वापर करुन विक्रमचा ढिगारा (डेब्रिस) ओळखणारे चेन्नईचे इंजिनिअर शनमुग सुब्रमण्यन यांनी इस्त्रोला एक ईमेल पाठवून प्रज्ञान रोव्हर काही मीटर पुढे सरकल्याचा दावा केला आहे.

भारतीय अवकाश संस्था इस्त्रोला पाठवलेल्या ई-मेलमध्ये शनमुग सुब्रमण्यन यांनी ‘नासा’ने मे महिन्यात जारी केलेल्या फोटोंवरुन प्रज्ञान काही मीटर पुढे आल्याचे संकेत मिळाले असल्याचा दावा केला आहे.

दरम्यान, यावर इस्त्रोचे प्रमुख के. सिवन यांचीही प्रतिक्रिया आली आहे. टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना त्यांनी, “आम्हाला याबाबत अजून नासाकडून कोणतीही माहिती मिळालेली नाही.

ज्या व्यक्तीने विक्रमचा ढिगारा ओळखला होता, त्याने आम्हाला याबाबत ई-मेल केला आहे. आमचे तज्ज्ञ त्यावर अभ्यास करत आहेत, पण आताच याबाबत काहीही सांगता येणार नाही”,अशी माहिती दिली आहे.

प्रज्ञान लँडर अजून शाबूत

४ जानेवारीच्या फोटोंवरुन(मे महिन्यात जारी झालेल्या) प्रज्ञान लँडर अजून शाबूत असून काही मीटर पुढे सरकल्याचं दिसतं. रोव्हर पुढे कसा सरकला असेल हे समजणं गरजेचं आहे,

इस्त्रो याबाबत नेमकी माहिती देईल अशी अपेक्षा आहे”, असं शनमुगा म्हणाले. तसेच, इस्त्रोकडून ( ग्राउंड टीमकडून) पाठवण्यात आलेल्या काही ‘ब्लाइंड’ कमांड्स प्रज्ञानने फॉलो केल्याची शक्यताही त्यांनी वर्तवली.

बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

जगप्रसिद्ध हर्ले डेव्हिडसन भारतातून गाशा गुंडाळणार

Team webnewswala

जन्म-मृत्यू दाखला आता ऑनलाइन पालिकेने घेतला निर्णय

Team webnewswala

निर्मितीनंतर आतून बाहेरून असे दिसेल भव्यदिव्य राम मंदिर

Team webnewswala

Leave a Reply