क्राईम तंत्रज्ञान शहर

MIDC चा Server hack हॅकर ची 500 कोटींची मागणी

एमआयडीसी (MIDC) चा सर्व्हर हॅक झाल्याचे राज्यात खळबळ उडाली आहे. एमआयडीसी सर्व्हर हॅक केल्यांतर हॅकर्सनी MIDC कडे 500 कोटी रुपये मागीतले आहेत.

MIDC चा Server hack हॅकर ची 500 कोटींची मागणी

मुंबई – महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (Maharashtra Industrial Development Corporation) म्हणजेच एमआयडीसी MIDC Server hack झाल्याचे राज्यात खळबळ उडाली आहे. प्राप्त माहितीनुसार, MIDC Server hack केल्यांतर हॅकर्सनी एमआयडीसीकडे 500 कोटी रुपये मागीतले आहेत. एमआयडीसीच्या अधिकृत मेल आयडीवर पाठवलेल्या मेलमध्ये तशी मागणी करण्यात आल्याचे प्रसारमाध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्त म्हटले आहे. गेल्या सोमवारपासून हा Server hack झाल्याने एमआयडीसीच्या कार्यालयांतील कामकाज बंद पडले आहे. यात मुंबई शहरातील मुख्य कार्यालयांसह प्रादेशिक कार्यालयांचा समावेश आहे.

हॅकर ची 500 कोटींची मागणी

या सर्व कार्यालयांमधील कामकाज ठप्प आहे. डेटा जर पूर्णपणे परत मिळवायचा असेल तर 500 कोटी रुपये द्या. अन्यथा सर्व डेटा नष्ट करु अशी धमकी हॅकर्सनी दिली आहे.

महत्त्वाचे असे की, एमआयडीसीशी संबंधित असणाऱ्या सर्व यंत्रणा ऑनलाईन प्रणालीशी जोडण्यात आलेल्या आहेत. या प्रणालीशी सर्व औद्योगिक वसाहती, उद्योजक, शासकीय घटक आणि विविध योजनांची संपूर्ण माहिती उपलब्ध असते. त्यामुळे गेल्या सोमवारपासून ही यंत्रणाच ठप्प झाली आहे. एमआयडीसीतील संगणक सुरु केला की त्यावर व्हायरस आढळून येत आहे. त्यामुळे जर या प्रणालीत प्रवेश केला तर संपूर्ण डेटाच नष्ठ होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामळे पूढील सूचना येईपर्यंत एमआयडीसीतील संगणक सुरु करु नये, अशा सूचना संबंधितांना देण्यात येत आहेत.

एमआयडीसी सर्व्हर हॅक करणारे हॅकर्स हे देशातील आहेत की देशाबाहेरील याचा शोध घेणे सुरु आहे. तसेच, सर्व डेटा रिस्टोर करण्यासाठी सायबर सेलकडे तक्रार करावी, असा सल्ला सायबर तज्ज्ञांनी दिला आहे. दरम्यान, सर्व्हर हॅक झाल्याने संबंधित यंत्रणा कोलमडल्यासारखे चित्र आहे. त्यामुळे ही प्रणाली पूर्ववत होईपर्यंत कामकाजाची व्यवस्था पर्यायी सुरु करावी अशी मागणी उद्योजकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, प्रादेशिक कार्यालये सुरु करण्यात आली आहेत.

कामकाजाची पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी

हॅकर्स देशातील आहेत की परदेशातील आहेत या संदर्भात अजूनही माहिती उपलब्ध झाली नसली तरी त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती मिळत आहे. मात्र एमआयडीसीच्या डेटा हॅक झाल्याचे समोर येताच एमआयडीसी प्रादेशिक कार्यालयात चौकशी सुरू करण्यात आली असून सर्व्हरची सिस्टिम व्यवस्थित होईपर्यंत कामकाजाची पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी उद्योजकांसह औद्योगिक संघटनांकडून होत आहे.

दरम्यान याआधीही गेल्यावर्षी मुंबई आणि परिसरातील वीज गायब होण्यामागे चिनी सायबर हल्ल्याचा संशय गृहमंत्री आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी व्यक्त केला होता मात्र MIDC चा डेटा हॅक झाल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

सर्व कार्यालयांना कॉम्प्युटर सुरु करु नका, अशी सूचना

गेल्या सोमवारपासून MIDC Server hack झाल्याने राज्यातील मुंबईतील मुख्य कार्यालयासह 16 प्रादेशिक कार्यालयातील संपूर्ण कामकाज बंद पडले आहे. एमआयडीसीशी संबंधीत सर्व औद्योगिक वसाहती, उद्योजक, शासकीय घटक आणि विविध योजनांची संपूर्ण माहिती ही एका ऑनलाईन सिस्टिमवर आहे. या सिस्टिम सर्व्हरचा डेटा हॅक झाला आहे. त्यामुळे गेल्या सोमवारपासून संपूर्ण कामकाज ठप्प झाले आहे. एमआयडीसीतील कॉम्प्युटर सुरु केल्यानंतर त्यात व्हायरस दिसत आहे. त्यामुळे जर या सिस्टिममध्ये प्रवेश केला, तर डाटा नष्ट होण्याचा धोका आहे. त्यामुळे एमआयडीसीने सर्व कार्यालयांना कॉम्प्युटर सुरु करु नका, अशी सूचना केली असल्याचंही समजतंय.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

धोपेश्वर सचिव मनोहर भगवान नवरे यांचा अजब कारभार माहिती अधिकार बाबत अज्ञान

Team webnewswala

आसनगावात ऊर्जा प्रकल्पातील राखेच्या वाहतुकीवरून रण

Team webnewswala

कांदा जेवणातून गायब होणार कांद्याचा दर गगनाला भिडणार

Team webnewswala

Leave a Reply