Team WebNewsWala
Other थोडक्यात राष्ट्रीय व्यापार समाजकारण

म्हापशाचे सुपुत्र Paulo Travels चे मारियो परेरा यांचं कोरोनामुळे निधन

Paulo Travels च्या माध्यमातून देशभर प्रवासी वाहतुकीचे जाळे उभारणारे म्हापशाचे सुपुत्र मारियो परेरा यांचं कोरोनामुळे निधन झालं

म्हापसा : Paulo Travels च्या माध्यमातून देशभर प्रवासी वाहतुकीचे जाळे उभारणारे म्हापशाचे सुपुत्र मारियो परेरा यांचं कोरोनामुळे निधन झालं. Paulo Travels मधून त्यांनी हजारो लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला. परेरा यांना काही दिवसांपूर्वी करोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर बांबोळी येथील गोवा मेडिकल कॉलेजमध्ये उपचारही चालू होते. मात्र त्यातून ते सावरू शकले नाहीत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा मायरन असा परिवार आहे.

गेली वीस वर्षे ही कंपनी गोव्याची ओळख बनली आहे

परेरा यांच्या निधनानंतर ‘गोव्याचा खरा सुपुत्र हरपला’, अशा भावना सर्व स्तरातून व्यक्त होत आहेत. परेरा यांनी Paulo Holiday Makers च्या ब्रँडखाली Paulo Travels ही प्रवासी वाहतूक करणारी कंपनी सुरू केली. गेली वीस वर्षे ही कंपनी दक्षिण भारतातील राज्ये आणि महाराष्ट्रात गोव्याची ओळख बनली आहे.

गोव्यात जायचं असेल, तर पावलू ट्रॅव्हल्सनेच, असं हक्काने सांगणारे हजारो प्रवासी आहेत.

मारियो परेरा यांचं पार्थिव शववाहिकेतून अंत्यसंस्कारांसाठी नेण्यात आलं. या अंत्ययात्रेवेळी पावलू टॅव्हल्सच्या सर्व लक्झरी बसेस एका रांगेत शववाहिकेच्या मागून सोडण्यात आल्या. बसचालकांनी सलग हॉर्न वाजवत आपल्या लाडक्या मालकाला विशेष मानवंदना दिली. या संबंधीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

Google, Amazon ला 16 कोटी डॉलर्सचा दंड

Team webnewswala

ग्रामीण भागात राहणाऱ्या आदिवासींना ओल्या गवतामुळे रोजगार

Team webnewswala

General Atlantic ची Reliance मध्ये गुंतवणूक

Team webnewswala

Leave a Reply