शहर

म्हाडाच्या ७५०० घरांची लॉटरी; जितेंद्र आव्हाड यांची घोषणा

लवकरच  ठाणे, कल्याण परिसरात म्हाडाच्या ७५०० घरांची लॉटरी जाहीर करणार आहे. येत्या काही दिवसांमध्ये याबद्दल अधिकृत घोषणा केली जाणार आहे.
म्हाडाच्या ७५०० घरांची लॉटरी; जितेंद्र आव्हाड यांची घोषणा

मुंबई : आपल्या हक्काचं घऱ विकत घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी म्हाडाने खूशखबर दिली आहे. लवकरच  ठाणे, कल्याण परिसरात म्हाडाच्या ७५०० घरांची लॉटरी जाहीर करणार आहे. येत्या काही दिवसांमध्ये याबद्दल अधिकृत घोषणा केली जाणार आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ही माहिती दिली आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ठाण्यात भंडारली आणि गोटेघर येथे तर कल्याणमध्ये शिरडोने कोणी येथील म्हाडाच्या घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे. मार्चमध्ये लॉटरीची प्रक्रिया आणि सोडत मे महिन्यात जाहीर होऊ शकते.

विरारमध्ये पोलिसांसाठी बांधण्यात आलेल्या घरांची लॉटरी आज काढण्यात आली. ज्या पोलिसांना घर हवं आहे त्यांनी कोकण म्हाडाशी संपर्क साधावा असं आवाहन आव्हाड यांनी यावेळी केलं. पोलीस, चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांना घरं उपलब्ध करून देणार असल्याचं ते म्हणाले आहेत.

कोळीवाड्यात एसआरए नाही 

“कोळीवाडे ही गावठाणे आहेत. गरजेनुसार पूर्व परंपरेने ही घरं बांधली असून जरी ही बैठी घरं असली तरी तिथे एसआरए योजना लागू होणार नाही. कोळीवाड्यांना एफएसआय देऊन त्यांचा विकास व्हावा असा प्रयत्न आहे,” अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

मुंबई आजपासून अनलॉक जाणून घ्या नवीन बदल

Web News Wala

KDMC ची नाटय़गृहांच्या भाडय़ात ७५ टक्के सवलत

Team webnewswala

महाबळेश्वरला पर्यटनस्थळाचा दर्जा मिळाल्याने विकासाला चालना

Team webnewswala

Leave a Reply