Team WebNewsWala
आरोग्य मनोरंजन

Messenger Of God Fame बाबा गुरमीत राम रहीम ला कोरोना

देवाचा अवतार असल्याचा दावा करणाऱ्या Messenger Of God Fame डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग याला अखेर कोरोनाने गाठलंय.

Messenger Of God Fame बाबा गुरमीत राम रहीम ला कोरोना 

Webnewswala Online Team – देवाचा अवतार असल्याचा दावा करणाऱ्या डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग याला अखेर कोरोनाने गाठलंय. बलात्कार व खुनाच्या गुन्ह्यात तो सध्या हरियाणाच्या रोहतक जिल्ह्यातील सुनारिया कारागृहात २० वर्षांचा कारावास भोगतोय. त्याला करोनाचा संसर्ग झाल्याचे समजताच एका खासगी रुग्णालयामध्ये हलवण्यात आले आहे.

पोटदुखी जाणवत असल्याने ३ जून रोजी रोहतक येथील पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस येथे गुरमीत राम रहीम सिंगच्या काही चाचण्या करण्यात आल्या होत्या. मात्र तेथे त्याने करोना चाचणी करून घेण्यास नकार दिला.

नंतर रविवारी त्याला गुरुग्राम येथली मेदांता रुग्णालयामध्ये आणखी काही चाचणी करण्यासाठी नेण्यात आलं. यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

दोन महिला शिष्यांचा बलात्कारप्रकरणी २० वर्षांचा कारावास पत्रकार राम चंदेर छत्रपती यांच्या खुनप्रकरणी जन्मठेप

याबाबत माहिती देताना, सुनारिया कारागृहाचे अधीक्षक सुनील सांगवान यांनी, ‘गुरमीत राम रहीम सिंगच्या काही चाचण्या पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस येथे होऊ शकल्या नाहीत. यानंतर आणखी एका सरकारी रुग्णालयाशी संपर्क साधला असता तेथे देखील करोना परिस्थितीमुळे चाचण्या शक्य नसल्याचं कळवण्यात आलं.

यानंतर कारागृह प्रशासनास या चाचण्या गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात केल्या जाऊ शकतात असं कळवण्यात आलं. याबाबतच्या परवानग्या घेऊन पुढील चाचण्या मेदांता येथे करण्यात आल्या.

तत्पूर्वी, मे महिन्यामध्ये त्याला भोवळ येणे व रक्तदाबात चढ-उतार या समस्या जाणवू लागल्याने त्याला एका सरकारी दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आले होते. एका रात्रीच्या उपचारांनंतर त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.

दरम्यान, गुरमीत राम रहीम सिंग याला २५ ऑगस्ट २०१७ रोजी दोन महिला शिष्यांचा बलात्कारप्रकरणी २० वर्षांचा कारावास तर सिरसा येथील पत्रकार राम चंदेर छत्रपती यांच्या खुन प्रकरणी जन्मठेप सुनावण्यात आली आहे.

Web Title – Messenger Of God Fame बाबा गुरमीत राम रहीम ला कोरोना ( Messenger Of God Fame Baba Gurmeet Ram Rahim La Corona )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

 

Related posts

‘तुझ्या इश्काचा नादखुळा’, रांगड्या प्रेमाची हळवी गोष्ट

Team webnewswala

दिवाळीच्या मुहूर्तावर येणार अक्षय कुमार चा लक्ष्मी बॉम्ब

Team webnewswala

Tearm insurance घेताना या १० महत्वपूर्ण चुका टाळा

Web News Wala

Leave a Reply