Team WebNewsWala
मनोरंजन

‘राधे’शी पंगा, भाईजानने ठोकला KRK वर मानहानीचा दावा

KRK अर्थात कमाल आर खान. ( kamaal r khan ) केआरकेने 'राधे'वर अशी काही टीका केली की भाईजान भडकला आणि त्याने केआरकेविरोधात मानहानीचा दावा ठोकला.

‘राधे’शी पंगा, भाईजानने ठोकला KRK वर मानहानीचा दावा

Webnewswala Online Team – भाईजान सलमान खानशी (Salman Khan ) पंगा घेणे एका अभिनेत्याला चांगलेच महागात पडण्याची चिन्हे आहेत. होय, हा अभिनेता कोण तर KRK अर्थात कमाल आर खान. ( kamaal r khan ) केआरकेने ‘राधे’वर अशी काही टीका केली की भाईजान भडकला आणि त्याने केआरकेविरोधात मानहानीचा दावा ठोकला. या कारवाईनंतर केआरकेने अनेक ट्विट केले आहेत. जे सध्या तुफान व्हायरल होत आहेत. (Salman Khan files defamation case against KRK )
मुंबईच्या एका कोर्टात केआरकेविरोधात दावा दाखल केला आहे. लवकरात लवकर यावर सुनावणी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. केआरकेवर ‘राधे- योर मोस्ट वॉन्टेड भाई’ या सिनेमाची प्रतीमा मलीन केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

केआरकेने त्याच्या ट्विटर व युट्यूब हँडलवर ‘राधे- योर मोस्ट वॉन्टेड भाई’चा रिव्ह्यू दिला होता. राधेचा पहिला पार्ट पाहून माझ्या मेंदूचा पार भुगा झाला. दुसरा पार्ट पाहण्याची माझी हिंमत होत नाहीये. दुसरा पार्ट पाहिला तर मला वेड लागेल, असे म्हणत केआरके रिव्ह्यू व्हिडीओमध्ये चक्क रडला होता.

केआरकेचे ट्विट

सलमानच्या या कारवाईनंतर केआरकेने अनेक ट्विट केलेत. ‘प्रिय सलमान, हा मानहानीचा दावा तुझ्या नैराश्याचा पुरावा आहे. मी माझ्या फॉलोअर्ससाठी रिव्ह्यू देतोय आणि माझे काम करतो. मला रिव्ह्यू देण्यापासून रोखण्याऐवजी तुला चांगले सिनेमे बनवायला हवे. मी सत्यासाठी ही लढाई नक्की लढेन. केससाठी धन्यवाद,’ असे पहिले ट्विट केआरकेने केले आहे.

Web Title – ‘राधे’शी पंगा, भाईजानने ठोकला KRK वर मानहानीचा दावा ( Mess with ‘Radhe’, brother slaps KRK for defamation suit )

webnewswala.com च्या Youtube चॅनेल वरील ताज्या बातम्या

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

 

Related posts

नृत्यदिगदर्शक साहिल शाह यांची राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभाग पुणे शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती

Team webnewswala

खोट्या TRP चं रॅकेट उघड रिपब्लिक चौकशीच्या घेऱ्यात

Team webnewswala

दोन वर्षांपासून २४० मराठी चित्रपट अनुदानासाठी रांगेत

Team webnewswala

Leave a Reply