Team WebNewsWala
शहर

राज्यात Maxicab ला परवानगी

Maxicab प्रवासी सेवा अधिकृत करण्याचा विचार परिवहन विभागाकडून होत आहे. Maxicab ला परवानगी दिल्यास एसटीसह सार्वजनिक परिवहन सेवांना फटका

Maxicab प्रवासी सेवा अधिकृत करण्याचा विचार परिवहन विभागाकडून होत आहे. यासंदर्भात मंगळवारी बैठक आयोजित केली आहे. Maxicab ला परवानगी दिल्यास एसटीसह इतर सार्वजनिक परिवहन सेवांना फटका बसण्याची चिन्हे आहेत.

परिवहन सेवा तोटय़ात जाण्यास प्रमुख कारण म्हणजे Maxicab

एसटीबरोबरच राज्यातील अन्य परिवहन सेवा कायम तोटय़ात राहिलेल्या आहेत. एसटीसारखी सेवा तोटय़ात जाण्यास प्रमुख कारण म्हणजे Maxicab सेवा. या सेवेला परवानगी देण्यासाठी १९९९ पासून राज्य सरकारकडून प्रयत्न होत होते. २००१ मध्ये एसटी महामंडळाने Maxicab विरोधात संपही पुकारला होता.

त्या वेळी हा प्रस्ताव बासनात गुंडाळला होता. त्यानंतर राज्य सरकारने एक समिती तयार केली. या कॅब सेवा एसटीसह अन्य सेवांना मारक ठरतील, असा अहवाल समितीने दिला होता. त्यानंतर सरकारने मंजुरी दिली नाही. परंतु आता मॅक्सीकॅब आणण्यासाठी पुन्हा जोरदार हालचाली सुरू आहेत. काही कंपन्यांनी परिवहन विभागाकडेच यासंदर्भात सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

Maxicab सेवेचे सध्याचे स्वरूप

मॅक्सीकॅब ही सात ते बारा आसनी प्रकारातील छोटय़ा आकारातील वाहने आहेत.

राज्यातील तालुका, ग्रामीण भागात ही वाहने अनधिकृतपणे धावतात.

अशा अनधिकृत वर दंडात्मक कारवाईही होते. त्यांना आरटीओकडून परवाना दिला जात नाही.

सध्या राज्यात मॅक्सीकॅब अनधिकृतपणे धावतात. त्यांना शासनाकडून परवानगी नाही. त्यांच्यावर कारवाईही होते. पूर्वी या सेवेला परवानगी मिळावी की नाही म्हणून एक समिती नेमली होती. त्यांच्या अहवालानंतर ही चर्चा थांबली होती. आता पुन्हा एकदा हा विषय पुढे आला असून मंगळवारी यासंदर्भात बैठक होणार आहे.

– अविनाश ढाकणे, परिवहन आयुक्त

मॅक्सीकॅबमुळे एसटीचे अस्तित्व धोक्यात येईल. यापूर्वीही मॅक्सीकॅब एसटीला मारक ठरेल, असेच निष्कर्ष निघाले आहेत. तत्कालीन परिवहन मंत्र्यांनी मॅक्सीकॅब आणणार नाही, असे आश्वासन दिले होते. मॅक्सीकॅब आणण्याचा प्रयत्न झाल्यास त्याला कडाडून विरोध होईल.

– संदीप शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र एसटी कामगार संघटना

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

माघी गणेशोत्सवात ‘POP’ बंदीस स्थगिती

Web News Wala

‘मुंबईसाठी एकच नियोजन प्राधिकरण हवे

Web News Wala

पश्चिम रेल्वेवर 7 AC लोकल प्रवाशांच्या सेवेत

Team webnewswala

Leave a Reply