Team WebNewsWala
Other ऑटो

Maruti Suzuki आणणार 800 cc इंजिनवाली बजेट कार

Maruti Suzuki will soon bring a budget car with 800cc engine

Maruti Suzuki भारतीय बाजारात नवनवीन प्रोडक्ट्स आणण्याची तयारी करत आहे. यातच कंपनी आता 4 मीटर यूव्ही, एक्सएल5 यूव्ही आणि 4 डोर जिम्नी आणण्याच्या तयारीत आहे.

कंपनी पुढील 2 वर्षात हे प्रोडक्ट्स भारतीय बाजारात आणणार आहे. याशिवाय कंपनी 800सीसी ची एंट्री लेव्हल कार देखील लाँच करणार असल्याचे सांगितले जात आहे. एंट्री लेव्हल सेगमेंटमध्ये मारुती सुझुकी भारतातील सर्वात यशस्वी ब्रँड्स पैकी एक आहे.

मारुती सुझुकी 800 कार भारतातील सर्वात लोकप्रिय कार पैकी एक

एका रिपोर्टनुसार, कंपनी भारतात ब्रेझा, सियाज, आर्टिगा आणि एक्सएल6 ला बीएस-6 डिझेल इंजिनमध्ये आणण्याची योजना बनवत आहे. या मॉडेल्समध्ये 1.5 लीटर डिझेल इंजिन मिळू शकते.

मारुती सुझुकीची नवीन 800सीसी इंजिन कार भारतीय बाजारात ऑल्टो 800 ला रिप्लेस करेल. नवीन कार HEARTECT-K प्लॅटफॉर्मवर आधारित असेल, ज्याचा उपयोग एस-प्रेसो आणि वॅग्नआरमध्ये केला जातो.

मारुतीची ही नवीन कार रेनॉ क्विडला टक्कर

कंपनीच्या नवीन हॅचबॅकमध्ये 800 सीसी इंजिन दिले जाईल. जे 47 बीएचपी पॉवर आणि 69 एनएम टॉर्क जनरेट करेल. कंपनी या कारमध्ये मॅन्युअल आणि एएमटी दोन्ही ट्रांसमिसन देऊ शकते.

मारुतीची ही नवीन कार रेनॉ क्विडला टक्कर देईल. या हॅचबॅकमध्ये काही नवीन फीचर्स देखील मिळू शकतात. नवीन कारमध्ये अँड्राईड ऑटो आणि अ‍ॅपल कारप्ले सपॉर्ट मिळू शकता.

याशिवाय ड्यूल फ्रंट एयरबॅग्स, ABS सोबत EBD, रिव्हर्स पार्किंग सेंसर, सीट बेल्ट रिमाइंडर आणि स्पीड अलर्ट सारखे फीचर्स मिळतील. ही कार 2022 पर्यंत भारतात उप्लब्ध होईल.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

या होळीला पुरणपोळी चे 8 प्रकार नक्की करा ट्राय

Web News Wala

गृहमंत्री अमित शाह यांना करोनाची लागण

Team webnewswala

ग्रामीण भागात राहणाऱ्या आदिवासींना ओल्या गवतामुळे रोजगार

Team webnewswala

1 comment

Kia Motors बहुचर्चित Kia Sonet कॉम्पक्ट एसयूव्ही लाँच - Team WebNewsWala October 1, 2020 at 10:02 am

[…] Maruti Suzuki आणणार 800 cc इंजिनवाली बजेट कार August 1, 2020September 18, 202097 […]

Reply

Leave a Reply