Other नोकरी शहर

राज्यात सव्वादोन लाख सरकारी पदे रिक्‍त

राज्यातील जिल्हा परिषदांसह सरकारी 29 विभागांमधील सव्वादोन लाख सरकारी पदे रिक्‍त आहेत. विभागांनी वित्त विभागाकडे पदभरतीसाठी मान्यता मागितली.

राज्यातील जिल्हा परिषदांसह सरकारी 29 विभागांमधील सव्वादोन लाख सरकारी पदे रिक्‍त आहेत. लोकहिताची कामे करताना येणाऱ्या अडचणींमुळे या विभागांनी वित्त विभागाकडे पदभरतीसाठी मान्यता मागितली. मात्र, कोरोनामुळे तिजोरीत अपेक्षित महसूल जमा होत नसल्याने ही भरती पुढच्या वर्षांत करावी, असा अभिप्राय वित्त विभागाने दिल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

फडणवीस सरकारच्या काळात दोन लाख पदे रिक्‍त
29 सरकारी विभागांसाठी सात लाख 34 हजार 756 जागा मंजूर
दरम्यान, राज्याच्या 29 सरकारी विभागांसाठी सात लाख 34 हजार 756 जागा मंजूर आहेत. त्यामध्ये गट “अ’ प्रवर्गातील 40 हजार 567, गट “ब’, “क’ आणि “ड’ या प्रवर्गातील सहा लाख 94 हजार 189 जागा आहेत. एकूण मंजूर पदांपैकी चार लाख 63 हजार 985 जागा सरळसेवेच्या, तर दोन लाख 70 हजार 771 जागा पदोन्नतीवरील आहेत. दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या गट “क’ आणि गट “ड’ संवर्गातील तीन लाख 64 हजार 348 जागा मंजूर आहेत. त्यातील 47 हजार 810 जागा पदोन्नतीवरील असून उर्वरित जागा सरळसेवेतून भरल्या जातात.
मेगाभरतीसाठी आग्रह मात्र, तिजोरीत पैसाच नाही 

महापरीक्षा पोर्टलच्या माध्यमातून 72 हजार रिक्‍त पदांची मेगाभरती करण्याचा निर्णय तत्कालीन फडणवीस सरकारने घेतला. मात्र, लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत ही भरती आचारसंहितेत अडकली. त्यानंतर महाविकास आघाडीने मार्च 2020 मध्ये सर्वच विभागांमधील रिक्‍त पदांची माहिती संकलित केली. त्यामध्ये सरकारी विभागांमधील गट ‘अ’च्या अकरा हजार, गट ‘ब’ 21 हजार 92, गट “क’ 86 हजार आणि गट “ड’च्या चार हजार 252, तर जिल्हा परिषदांमधील 47 हजार जागांचा समावेश होता. त्यानुसार महाविकास आघाडी सरकारने एकूण रिक्‍त पदाच्या 50 टक्‍के जागा भरतीचे नियोजनही केले. मात्र, कोरोनामुळे ते अद्यापही स्वप्नच राहिले. काही विभाग कंत्राटी कर्मचाऱ्यांमार्फत कामे करुन घेत आहेत.

विभागनिहाय रिक्‍त जागा
  • गृह – 25,848
  • सार्वजनिक आरोग्य – अंदाजित 20,000
  • सामाजिक न्याय – 3,127
  • जलसंपदा – 21,073
  • उद्योग- कामगार – 3,456
  • कृषी व पशुसंवर्धन – 15,283
  • महसूल व वने – 12,098
  • महिला व बालविकास – 1,997

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

MumUni School Of Thoughts तर्फे प्रा. संजीव चांदोरकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन

Team webnewswala

सुधीर भाऊंच्या कल्पनेतून साकारलेले बांबू रिसर्च सेंटर जळून खाक

Web News Wala

केंद्र सरकारच्या उच्च शिक्षणसंस्थांसाठी गाइडलाइन्स

Team webnewswala

Leave a Reply