Team WebNewsWala
आरोग्य

काळी मिरी खाण्याचे बरेच फायदे

काळी मिरी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. काळी मिरी बर्‍याच रोगांमध्येही हे प्रभावी. काळ्यामिरी औषधी गुणांनी परिपूर्ण आहे.

काळी मिरी खाण्याचे बरेच फायदे

काळी मिरी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. काळी मिरी बर्‍याच रोगांमध्येही हे प्रभावी मानली जाते. काळ्यामिरीत पेपरिन नावाचा घटक असतो. हा घटक औषधी गुणांनी परिपूर्ण आहे. यात लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम, मॅंगनीज, जस्त, क्रोमियम, व्हिटामिन ए आणि इतर पोषक गुणधर्म आढळतात. याशिवाय यामध्ये रायबोफ्लेविन, थायामिन, पोटॅशियम, सोडियम, फॉलेट, बेटेन आणि नियासिन हे घटकदेखील आढळतात. या कारणांमुळे स्वादासह काळीमिरी आपल्या आरोग्यासाठीही लाभदायक आहे. (Many benefits of eating black pepper)

गॅसची समस्या

गॅसची समस्या असल्यास काळी मिरी हा रामबाण उपाय आहे. एक कप पाणी घेऊन त्यामध्ये अर्धा चमचा लिंबाचा रस, अर्धा चमचा काळी मिरी पूड आणि अर्धा चमचा काळं मीठ याचं काही दिवस सेवन केल्याने गॅसची समस्या दूर होते.
[4:52 PM, 3/24/2021] webnewswala.com: -जर तम्हाला सतत खोकल्याचा त्रास होत असेत तर काळीमिरीचा वापर करून तुम्ही या समस्येतून मुक्त होऊ शकता. काळीमिरी सेवन केल्याने 3 ते 4 दिवसांतच फरक दिसून येईल

खोकला

खोकला येत असेल तरी सुद्धा काळी मिरी लाभदायक ठरते. अर्धा चमचा काळी मिरी पूड आणि अर्धा चमचा मध एकत्र करुन खाल्याने खोकला दूर होतो.

अपचन

अपचनाची समस्या निर्माण होत असेल तर, लिंबाचा अर्धा तुकडा घेऊन त्यातील बिया काढून टाका. त्यात काळे मीठ आणि मिरपूड भरून गरम करा आणि चोखा. याने अपचनाची समस्या दूर होईल.

फुफ्फुसात आणि श्वसन नलिकांमध्ये संसर्ग झाल्यास आपण काळीमिरी आणि पुदीना युक्त चहा पिऊ शकता.

सतत खोकल्यामुळे त्रास होत असल्यास, काळीमिरीच्या 4-5 दाण्यांसह 15 मनुका चावून खाल्ल्याने आराम मिळेल.

जर घसा बसला असेल, तर तूप, साखर आणि मिरपूड मिसळून त्याचे चाटण तयार करा.

(टीप : कोणत्याही उपायांचा अवलंब करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्या.)

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा :webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा :फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

माहित असायलाच हवेत हे शिलाजित वापराचे फायदे

Web News Wala

कोरोना विरोधात लढण्यासाठी भारतीय Covaxin No 1

Web News Wala

CoviShield निर्यात सुरू, ब्राझिलला २ लाख डोस रवाना

Web News Wala

Leave a Reply