Team WebNewsWala
क्राईम पर्यावरण शहर

पर्यावरणाला घातक माशांची मांगूर पैदास

पर्यावरणासाठी धोकादायक असलेल्या आणि केंद्रीय हरित लवादाने उत्पादनास बंदी घातलेल्या मांगूर माशांची भिवंडीत मोठय़ा प्रमाणात पैदास

ठाणे : पर्यावरणासाठी धोकादायक असलेल्या आणि केंद्रीय हरित लवादाने उत्पादनास बंदी घातलेल्या मांगूर माशांची भिवंडीत मोठय़ा प्रमाणात पैदास होत असल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी उघडकीस आला आहे. मत्स्यव्यवसाय विभागाने भिवंडीतील पडघा भागात कारवाई करून १५ तलावांतील ४ हजार २०० किलो मांगूर मासे नष्ट केले आहेत. या प्रकरणात मत्स्यव्यवसाय विभागाने तिघांना ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे हे १५ तलाव वन विभागाच्या जागेत बांधण्यात आले आहेत. त्यामुळे वन विभागाच्या कारभारावरही प्रश्न उपस्थित झाला आहे.

भिवंडीत ४ हजार २०० किलो मांगूर मासे नष्ट
पर्यावरणासाठी धोकादायक असलेल्या आणि केंद्रीय हरित लवादाने उत्पादनास बंदी घातलेल्या मांगूर माशांची भिवंडीत मोठय़ा प्रमाणात पैदास
प्रातिनिधिक फोटो

पडघा येथील कुंभार शिव परिसरातील जंगलात मोठय़ा प्रमाणात मांगूर माशांची पैदास होत असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय विभागाचे साहाय्यक आयुक्त आनंद पालव यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे, मत्स्यव्यवसाय विभागाचे पथक, वन विभाग, पोलीस पाटील सतीश जाधव यांनी घटनास्थळी जाऊन सोमवारी आणि मंगळवारी १५ तलावांतील ४ हजार २०० किलो मांगूर मासे नष्ट करून बांधकाम केलेले तलावही तोडले आहेत. या प्रकरणी तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय विभागाने दिली. हा सर्व प्रकार वन विभागाच्या जागेत सुरू होता. इतक्या मोठय़ा प्रमाणात मांगूरचे उत्पादन होत असतानाही वन विभागाला याची माहिती नसल्याने त्यांच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

म्हणून मांगूरवर बंदी

मांगूर मासा हा कुजलेले मांस, पाण्यात असलेला जैविक आणि अजैविक कचरा खाऊन मोठा होणारा मासा आहे. त्यामुळे हा मासा पाण्यात असल्यास त्याचा धोका पाण्यातील जैवविविधतेला, इतर माशांनाही पोहोचवतो. मांगूरमुळे इतर माशांच्या प्रजाती लुप्त होण्याची भीती असते.

’ मांगूर माशाचे सेवन मानवी आरोग्यासही अपायकारक ठरू शकते. म्हणून त्या माशाच्या उत्पादनावर बंदी घालण्यात आली आहे.

’ सध्या हा मासा बांगलादेशातून छुप्या पद्धतीने भारतात आणला जात आहे. अत्यंत कमी पाण्यामध्येही हा मासा जिवंत राहतो. मासळी बाजारात अवघ्या १०० रुपये किलोने हा मासा विक्री केला जातो. हा मासा उत्पादनासाठी स्वस्त असल्याने अनेक जण याची बेकायदा मत्स्यशेती करत आहेत.

आमच्या आणखी बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा : webnewswala.com आमच्या सर्व बातम्यांसाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | youtube | Sharechat | Copyright © Webnewswala All rights reserved.

Related posts

शहरात लवकरच धावणार 100 डबलडेकर बस

Team webnewswala

राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत अथर्व समीर शिरवडकर ची बाजी

Team webnewswala

मॉरिशस संकट वाढलं; तेलगळती होणारं जहाज तुटण्याची शक्यता

Team webnewswala

Leave a Reply